https://images.loksatta.com/2020/02/2020-02-13-2.jpg?w=830

“प्रेम शेअर करा पण…”; पुणे पोलिसांकडून ‘व्हॅलेंटाइन डे’ची टीप

आजचा दिवस संपूर्ण जगात 'व्हॅलेंटाइन डे' म्हणून साजरा केला जातो.

by

आज १४ फेब्रुवारी. आजचा दिवस संपूर्ण जगात ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी लोक आपल्या लाडक्या व्यक्तीला विविध प्रकारच्या भेटवस्तू, ग्रिटींग कार्ड्स, फुलांचा गुच्छ वगैरे भेट देऊन त्याच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. दरम्यान पुणे पोलिसांनी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अवश्य वाचा – नेहा कक्कर संतापली; लगावली सहकलाकाराच्या कानशीलात

अवश्य पाहा – ऐश्वर्या राय सारखी दिसणारी ‘ही’ सौंदर्यवती आहे तरी कोण?

अवश्य पाहा – ‘या’ श्रीमंत अभिनेत्रीसमोर शाहरुख खानही वाटतो गरीब

अवश्य पाहा – मराठमोळ्या मानसीच्या अदा पाहून व्हाल फिदा

“प्रेम शेअर करा, पासवर्ड नाही” असे ट्विट पुणे पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आले आहे. सध्या आपण इंटरनेटच्या जगात वावरत आहोत. आपली संपूर्ण खासगी माहिती आज इंटरनेटवर स्टोअर आहे. शिवाय सोशल मीडियाव्दारे यात आपण दररोज भर टाकतच असतो. या माहितीला आपण पासवर्डव्दारे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे पासवर्ड कोणत्याही अज्ञात व्यक्तीला शेअर करु नका. कारण तुमच्या खाजगी माहितीचा गैरवापर देखील केला जाऊ शकतो. असा सल्ला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने पुणे पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांनी आपल्या अनोख्या शैलीत केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तरुण पिढीला हा अनोखा संदेश विशेष पसंतीस पडल्याचे दिसत आहे. नेटकऱ्यांनी देखील पोलिसांवर ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.