https://images.loksatta.com/2020/02/RITESH-.jpg?w=830
रितेश-जेनेलिया

Valentines day : अन् ‘त्या’ क्षणापासून सुरु झाला रितेश-जेनेलियाच्या प्रेमाचा प्रवास

हे नातं लग्नापर्यंत पोहोचेल याची कल्पना या दोघांनाही नव्हती

by

महाराष्ट्राचा लेक आणि सुनबाई म्हणून ओळखली जाणारी जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया. या दोघांकडे पाहिल्यानंतर लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात यावर विश्वास बसतो. ही जोडी कायम एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातलं प्रेम दिसून ही येतं. रितेश वेळोवेळी दोघांच्या आनंदाचे क्षण सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. मात्र या दोघांचं सूत कसं जुळलं किंवा त्यांची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली हे कोणालाच माहित नाही.
‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात या दोघांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्याच निमित्ताने ते पहिल्यांदाच हैदराबाद विमानतळावर भेटले. मात्र यावेळी जेनेलियाचं वागणं रितेशला फार काही पटलं नाही. त्याने स्वत:हून तिच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला मात्र जेनेलियाने त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. परंतु पुढे जसजसे एकमेकांना त्यांचे स्वभाव कळत गेले तसं त्यांच्यातलं प्रेम खुललं.

चित्रपटाच्या निमित्ताने या दोघांची हैदराबाद विमानतळावर भेट झाली. या भेटीमध्ये जेनेलिया रितेशच्या आधीच येऊन थांबली होती. विशेष म्हणजे ही गोष्ट रितेशला माहितदेखील होती. त्यातच रितेश मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्यामुळे त्याच्याच थोडाफार अहंकार असणार असं जेनेलियाला वाटलं होतं. त्यामुळे त्याने अॅटीट्यूड दाखवण्यापूर्वीच तिने त्याला अॅटीट्यूड दाखवायला सुरुवात केली. रितेशने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर जेनेलियाने त्याच्याशी हात मिळविला. मात्र तिचं लक्ष इकडे-तिकडेच होतं. खरंतर जेनेलियाचं हे वागणं रितेशला काही पटलं नव्हतं. परंतु चित्रपटामुळे ते जसंजसं एकमेकांला समजू लागले. त्यांच्यात चांगली मैत्री झाली.

https://scontent-lhr8-1.cdninstagram.com/v/t51.2885-15/e35/p1080x1080/67361110_132715614620087_5861996669930564479_n.jpg?_nc_ht=scontent-lhr8-1.cdninstagram.com&_nc_cat=111&_nc_ohc=HSf8HLnxr8AAX-btkYC&oh=928fd2feecca7ca8260d3ff0a79d0b2c&oe=5EC0B76D
Sunshine Girl & Me

चित्रपटाच्या निमित्ताने भेटलेल्या या जोडीच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं हे त्या दोघांनाही समजलं नाही. त्यावेळी रितेश २४ वर्षांचा होता तर जेनेलिया १६ वर्षांची होती. बऱ्याच वेळा हे दोघं त्यांच्या शिक्षणाविषयी चर्चा करायचे. जेनेलिया रितेशला कायम आर्किटेक्चरबद्दल काही ना काही सांगत रहायची. मात्र या दोघांचं नात लग्नापर्यंत पोहोचेल याची कल्पना या दोघांनाही नव्हती. चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यानंतर रितेश ज्यावेळी घरी परत आला तेव्हा त्याला सतत जेनेलियाची आठवण येत होती. मात्र एखाद्या मुलीला लगेच फोन करणं योग्य नसल्याचं म्हणत तो तिला फोन करायंच टाळत होता. दुसरीकडे जेनेलियालादेखील रितेशची आठवण येत होती. परंतु हेच प्रेम आहे याची जाणीव त्यांना त्यावेळी झाली नव्हती.

वाचा : ओळखा कोण आहे ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री? तिच्या सौंदर्यावर आज लाखो फिदा

दरम्यान, ‘तुझे मेरी कसम’नंतर या दोघांनी मस्ती या चित्रपटात पुन्हा एकत्र काम केलं. त्यानंतर मात्र याचं नातं अधिक खुललं. २०१२ मध्ये लग्न केलेली ही जोडी आजही एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात हे दिसून येतं. या दोघांना दोन गोंडस मुलंदेखील आहेत.