https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/yoga-day_20180696596.jpg
थायरॉइडचा त्रास जाणवतो; मग 'ही' सात योगासनं ठरतील फायदेशीर

थायरॉइडचा त्रास जाणवतो; मग 'ही' सात योगासनं ठरतील फायदेशीर

योग साधना संपूर्ण आरोग्य उत्तम राहण्यास मदत करते. आपल्या शरीराची लवचिकता वाढवते.

by

- डॉ. हंसाजी जयदेव योगेंद्र 
योग साधना संपूर्ण आरोग्य उत्तम राहण्यास मदत करते. आपल्या शरीराची लवचिकता वाढवते. ऊर्जा संतुलित राखून तणाव कमी करण्यास मदत करते. थायरॉईड आणि तणाव यांच्यात संबंध आहे. कमी किंवा जास्त प्रमाणात असलेला थायरॉइडमध्ये शरीराचे संतुलन राखण्यास योग सहाय्यता करू शकतो. कित्येक आसन अशी आहेत ज्याने तुमचा थायरॉइड नियंत्रणात आणू शकतो. थायरॉइडसाठी जी आसनं आहेत ती साधारणतः घशाला फायदेशीर ठरतात. त्या आसनामुळे घशातील ग्रंथीमधील ऊर्जा व रक्तप्रवाह सुधारतो आणि मानेचे स्नायू बळकट होतात. या लेखात काही आसनं दिलेली आहेत, जी आपल्याला थायरॉईड बरा होण्यास मदत करू शकतात.

सर्वांगासन:- (खांदा स्टँड) आपल्याला थायरॉक्सिन नियंत्रित करण्यासाठी आणि थायरॉइड ग्रंथींना पुनर्जीवित (active)  करण्यासाठी मदत करतात. या आसनांमध्ये डोकं खाली व दोन्ही पाय उलट्या दिशेला वर केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह डोक्यापर्यंत जातो.

भुजंगासन :- हा अतिशय सोपा आसन प्रकार आहे. घसा आणि मान या दोन्ही भागांमध्ये रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे थायरॉइड ग्रंथीचे कार्य वाढते. हे मान आणि मणक्याचे दुखणेसुद्धा कमी करते. या आसनामुळे मानेचे स्नायू बळकट होतात.

मत्स्यासन :- या आसनामुळे सांधे आणि स्नायू कडक होत नाहीत. त्यामुळे ताणतणाव कमी होतो. हे आसन शारीरिकदृष्ट्या आरामदायी ठरते. या आसनामुळे मूड स्विंग आणि नैराश्य यांना प्रतिबंध घातला जातो. जी थायरॉइडची लक्षण आहेत. 

सेतुबंधासन :- (ब्रीज पोझ) हे आसन मानेच्या स्नायूवर काम करते. ज्यामुळे स्नायू पूर्णपणे ताणले जातात. या आसनामुळे मेंदूला शांत करणे, चिंता कमी करणे आणि पचनक्रिया सुधारण्यास फायदा होतो.

प्राणायम :- उज्जय्यी, भ्रामरी, नाडी शोधन हे सगळे प्राणायम मानेच्या स्नायूंवर कार्य करतात, थायरॉइडच्या लक्षणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे सगळे प्राणायम प्रभावी आहेत.

ध्यान :- जप किंवा मंत्रासह ध्यान केल्यास थायरॉइडवर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. दररोज काही मिनिटे ध्यान केल्यास मन शांत आणि तणावाची पातळी कमी होण्यास मदत होते.

शवासन :- शवासन हायपर किंवा हायपोथायरॉईड या दोन्ही प्रकारासाठी काम करते. हे आपल्याला शांत करते  आणि तणावाची पातळी देखील खाली आणते. 

चांगली झोप :- योग्य व पुरेशी झोप मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले शरीर नैसर्गिकरीत्या मेलाटोनिम सोडते. झोपेच्या वेळी पायनल ग्रंथी देखील आपले कार्य करत असतात. ज्यामुळे शरीरातील हार्मोनचे संतुलन राखण्यास मदत होते. म्हणूनच रात्री १० वाजता झोपले पाहिजे. त्यामुळे झोपेचे एक व्यवस्थित चक्र पूर्ण होईल. 

सक्षम आणि निष्णात अशा योग शिक्षकेकडूनच योगासने शिकवीत. योगाचा आपल्या शरीरावर, मनावर आणि श्वासावर चमत्कारिक व चांगला परिणाम होऊ शकतो. परंतु दररोज व पूर्णपणे जागरूकतेने योगाचा सराव केला तरच असे होऊ शकते. आपण आपली थायरॉईडची औषधे घेणे थांबावू नये. औषधासोबतच योगाचा सराव चालू ठेवावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे कमी किंवा बंद करावीत. योग सुखी जीवनाचा एक सोपा मार्ग आहे. दररोज सुरक्षितपणे याचा सराव करा. योग आपल्याला थायरॉईडचा सामना चांगल्या आणि कार्यक्षम पद्धतीने करण्यास नक्कीच मदत करेल.

(लेखिका द योग इन्स्टिट्युटच्या संचालिका आहेत.)