https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/quran_202001363586.jpg
खळबळजनक! ऐतिहासिक कुराण विक्रीसाठी त्याने केला १६ कोटींचा सौदा  

खळबळजनक! ऐतिहासिक कुराण विक्रीसाठी त्याने केला १६ कोटींचा सौदा  

ऐतिहासिक कुराणाची प्रत चोरणाऱ्यास ठोकल्या बेड्या

by

ठळक मुद्दे

राजस्थान - भिलवारा परिसरात सुवर्ण अक्षराने लिहिलेल्या कुराणाची प्रत चोरल्याप्रकरणी एकास पोलिसांनीअटक केली आहे. अटक आरोपीचे नाव बनवारी मीना आहे. चोरलेल्या कुराणाच्या प्रतीला ऐतिहासिक महत्व असून त्याची किंमत खूप आहे. 

https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/quoran-12_202001363585.jpg

आरोपी बनवारीचा प्रदीर्घ पाठलाग केल्यानंतर माहिती गोळा करत त्याला अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. एएसआय हरिओम यांना माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती बायजीच्या खांद्याजवळ पुरातन पुस्तकाचा सौदा करण्यासाठी फिरत आहे. यावर पोलिसांनी सापळा रचून बनवारी ( 29) याला ताब्यात घेतले व  त्याच्या ताब्यातून कुराण शरीफचे ऐतिहासिक पुस्तक जप्त केले. आरोपी बनवारीने चौकशीत पोलिसांना खळबळजनक माहिती दिली की, त्याने बांगलादेशातील एका पार्टीला सुवर्ण अक्षराने लिहिलेलेल्या कुराण विकण्यासाठी 16 कोटी रुपयांचा सौदा केला होता. हा सौदा होण्यापूर्वीच त्याच्या साथीदारास पोलिसांनी अटक केली. त्यानंतर बनवारी त्याच्या साथीदारांसह फरार झाला होता. बनवारीचा दुसरा साथीदार खेमा उर्फ खेमचंद याला गेल्या काही दिवसांपूर्वी माणक चौकात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. त्याच्या ताब्यातून 4,77,50,000 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.  

https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/quoran_202001363584.jpg