https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/ganesh-acharya-rejects-the-accusations-made-against-him-by-saroj_202001361963.jpg
गणेश आचार्य यांनी 'त्या' महिलेविरोधात केली पोलीस ठाण्यात तक्रार

गणेश आचार्य यांनी 'त्या' महिलेविरोधात केली पोलीस ठाण्यात तक्रार

उद्या याबाबत पत्रकार परिषद घेऊन आचार्य अधिक माहिती माध्यमांसमोर मांडणार आहे. 

by

ठळक मुद्दे

मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध गणेश आचार्य यांनी त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नुकतीच बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्सना आपल्या तालावर नाचवणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यविरोधात एका ३३ वर्षीय नृत्यदिग्दर्शिकेने अंबोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. गणेश आचार्य कमिशनची मागणी करत अश्लिल व्हिडीओ पाहण्यासाठी बळजबरी करत असल्याचा गंभीर आरोप या महिलेने केला आहे. त्यानंतर, आता ओशिवरा पोलीस ठाण्यात गणेश आचार्य यांनी संबंधित महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. उद्या याबाबत पत्रकार परिषद घेऊन आचार्य अधिक माहिती माध्यमांसमोर मांडणार आहे. 

 गणेश आचार्य विरोधात नृत्यदिग्दर्शिकेची तक्रार; अश्लील व्हिडिओ बघण्यास बळजबरी केल्याचा आरोप

महिलेच्या तक्रारीनंतर गणेश आचार्यनं सर्व आरोप फेटाळून लावले. या सर्व प्रकरणात सरोज खानचा हात असून माझ्याविरोधात असे आरोप करणाऱ्या लोकांना घाबरणाऱ्यातील मी नाही. मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन. मी त्या महिलेला ओळखतही नाही आणि लोकांना माहित आहे की गणेश आचार्य व्यक्ती म्हणून कसा आहे किती लोकांचं करिअर मी मार्गी लावलं आहे असा खुलासा एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार,  इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनचे महासचिव असलेल्या गणेश आचार्यवर संबंधित महिलेने अनेक आरोप केले. पीडितेच्या तक्रारीनुसार, गणेश आचार्य इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनचा महासचिव बनल्यापासून तिचा मानसिक छळ करत होता. तिने विरोध केल्यावर गणेशने तिचे सदस्यत्व रद्द केले, ज्यामुळे तिचे उत्पन्न बंद झाले. ती दुस-या नृत्य दिग्दर्शकाकडे काम मागण्यास जायची तेव्हा तिला आधी गणेश आचार्य सोबतची भांडणे मिटव आणि मगच आमच्याकडे ये असे तिला सगळे सांगात असे. 

गणेश आचार्यनं फेटाळले महिला कोरिओग्राफरचे आरोप, म्हणाला - या सगळ्यात सरोज खानचा हात

२६ जानेवारीला माझे सदस्यत्व का रद्द केले? असा जाब विचारला असता गणेश आचार्य संतापला आणि त्याने त्याच्या सोबतच्या कोरिओग्राफर्सला सांगून पीडितेला बाहेर हाकलण्यास सांगितले. त्याच्या सांगण्यावरून दोन महिला कोरिओग्राफर्सनी पीडितेला मारहाण केली. पीडिता गणेशच्या ऑफिसात जायची तेव्हा तो तिला अश्लिल व्हिडीओ पाहण्यास बळजबरी करायचा असा आरोप त्या महिलेने केला. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान यांनीही गणेश आचार्यवर गंभीर आरोप केले होते. गणेश आपले वजन वापरून नव्या डान्सर्सला गंडवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.