https://images.loksatta.com/2020/01/raj-thackeray-1.jpg?w=830
(संग्रहित छायाचित्र)

राज ठाकरेंचे विद्युत आयोगाला पत्र, BEST च्या वीज दरवाढीवर मनसेचा आक्षेप

बेस्टच्या परिवहन विभागाच्या तुलनेत विद्युत विभाग नफ्यामध्ये आहे.

by

बेस्टच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पत्र लिहिले आहे. यामध्ये विद्युत विभागाचा नफा परिवहन विभागाकडे वळता करु नये अशी मागणी त्यांनी केली आहे.

बेस्टच्या परिवहन विभागाच्या तुलनेत विद्युत विभाग नफ्यामध्ये आहे. परिवहनचा तोटा भरुन काढण्यासाठी विद्युत विभागाचा नफा तिथे वळवला जातो. परिमाणी बेस्टने आता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे वीज दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

त्यावर मनसेचे आक्षेप नोंदवला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे बेस्टचा प्रस्ताव असला तरी त्यासंबंधी अजून अंतिम निर्णय झालेला नाही.