गरोदरपणानंतर त्वचेवरील सिझरच्या खूणा घालवण्यासाठी 'हे' ३ उपाय ठरतील उत्तम
अनेक महिलांची डिलीव्हरी होत असताना सिजर करावं लागतं.
by ऑनलाइन लोकमतअनेक महिलांची डिलीव्हरी होत असताना सिझर करावं लागतं. त्यामुळे ओटी पोटावर अनेक खुणा दिसत असतात. आपल्याला अनेकदा या खुणांचा त्रास सुद्धा होत असतो. सिझरमुळे झालेल्या सी- सेक्शन स्कार दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. त्यांचा वापर करून तुम्ही आपल्या पोटावर असेलेल्या खूणा घालवू शकता. या खुणांना तु्म्ही सी सेक्शन स्कार असं सुद्धा म्हणतात.
सिझेरियन डिलीव्हरीनंतर सुज येणे त्वचा लाल होणे या समस्या उद्भवतात. काही महिलांना जखमा होऊन इन्फेक्शन सुद्धा झालेलं असतं. सी सेक्शन स्कार झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात. क्लिअर स्त्राव या ठिकाणातून होत असतो. यामुळे पायांना सूज येणे, पोटाचे विकार उद्भवणे, ताप येणे, डोकेदुखी, डिहाड्रेशन होत असते. तसंच काहीही खाण्याची इच्छा होत नाही. मासंपेशी दुखण्याचा त्रास होतो. सी-सेक्शन स्कारला मुलायम ठेवण्यासाठी तुम्ही पेट्रोलियम जेलीचा वापर करून खाजेपासून सुटका मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही त्वचेवरील सेक्शन स्कारला दूर करू शकता.
एलोवेरा जेल
सिझरच्या खूणा कमी करण्यासाठी एलोवेरा जेल फायदेशीर ठरतं असतं. एलोवेराचे त्वचेला अनेक फायदे आहेत. एलोवेरात असलेले एन्टी ऑक्सीडंट्स त्वचेसाठी फायदेशीर ठरत असतात. त्यामुळे व्हिटामीन ई चा फायदा मिळत असतो. म्हणून एलोवेरा जेलचा वापर करून तुम्ही सिझरच्या खूणा मिटवू शकता. त्यासाठी एलोवेरा जेलने त्या भागावर मसाज करा. त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होईल. ( हे पण वाचा-आकर्षक त्वचेसाठी पार्लरचा खर्च वाचवून घरच्याघरी वापरा 'हे' फेसपॅक)
तेलाने मसाज
सिझरच्या खूणांपासून सुटका मिळवण्यासाठी व्हिटामीन ई च्या तेलाने मसाज करा. त्यामुळे त्या ठिकाणची त्वचा मऊ मुलायम होईल आणि खूणा निघून जाण्यास मदत होईल. याशिवाय तुम्ही लेजर थेरेपीचा वापर करून सुद्धा त्वचेला चांगलं ठेवू शकता. पण घरगूती उपायांच्या तुलनेत लेजर थेरेपी खूपच खर्चीक असते. ( हे पण वाचा-पिंपल्सची 'ही' कारणं तुम्हाला माहीत असतील तरच मिळवाल पिंपल्समुक्त चेहरा)
मध
मधामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे नैसर्गिकरित्या तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. आपल्या शरीरातील रॅडिकल्ससह लढण्यासाठी मधात असणारे अँटीऑक्सिडंट्स मदत करतात. त्यामुळे मधाचा वापर जर तुम्हाला सिझरच्या खूणा सहजेतेने घालवता येतात. मधाचा वापर करून तुम्ही त्वेचंच टॅनिंग सुद्धा दूर करू शकता.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)