https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/whatsapp-image-2020-01-_202001363537.jpeg
Nirbhaya Case : तारीख पे तारीख! निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली 

Nirbhaya Case : तारीख पे तारीख! निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली 

दिल्ली जेल नियमांनुसार फाशी एकत्रच दिली जाते. 

by

ठळक मुद्दे

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींची फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी उद्या म्हणजेच १ फेब्रुवारीला होणार होती. त्यासाठी कोर्टाने दुसऱ्यांदा डेथ वॉरंट जारी केला होता. मात्र, निर्भयाच्या दोषींना उद्या होणारी फाशीची शिक्षा टळली आहे. पटियाला हाऊस कोर्टाने पुढील आदेश होईपर्यंत डेथ वॉरंटला स्थगिती दिली आहे. 

सुनावणीदरम्यान दोषींच्या वकिलाने सांगितले की, दोषींकडे सध्या कायदेशीर उपाय उपलब्ध आहेत. दिल्ली जेल नियमांनुसार फाशी एकत्रच दिली जाते. अशा परिस्थितीत मृत्यूदंडाची वॉरंट अनिश्चित काळासाठी थांबविला पाहिजे. त्याचबरोबर मुकेशच्या वकील वृंदा ग्रोव्हर यांच्या कोर्टातील उपस्थितीवर निर्भयाच्या वकील सीमा कुशवाह आणि सरकारी वकील यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, जेव्हा मुकेशवर सर्व कायदेशीर पर्याय संपले असताना या प्रकरणात आता त्याच्या वकिलाचा कोर्टात या केसशी काहीही संबंध नाही.

Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिला दणका; याचिका फेटाळली

Nirbhaya Case : दोषींच्या फाशीच्या स्थगिती याचिकेवर कोर्ट आजच निर्णय देणार?

https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/whatsapp-image-2_202001363536.jpeg

सुनावणीदरम्यान दोषींच्या वकिलाने सांगितले की, दोषींकडे सध्या कायदेशीर उपाय उपलब्ध आहेत. दिल्ली जेल नियमांनुसार फाशी एकत्रच दिली जाते. अशा परिस्थितीत मृत्यूदंडाची वॉरंट अनिश्चित काळासाठी थांबविला पाहिजे. त्याचबरोबर मुकेशच्या वकील वृंदा ग्रोव्हर यांच्या कोर्टातील उपस्थितीवर निर्भयाच्या वकील सीमा कुशवाह आणि सरकारी वकील यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, जेव्हा मुकेशवर सर्व कायदेशीर पर्याय संपले असताना या प्रकरणात आता त्याच्या वकिलाचा कोर्टात या केसशी काहीही संबंध नाही.

दोषीचे वकील ए.पी. सिंग म्हणाले की, अक्षयची क्युरेटिव याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयातून फेटाळून लावली गेली. आता दया याचिका दाखल करायची आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाला त्या आदेशाची प्रत मिळाली नाही. सिंग पुढे म्हणाले की, जोपर्यंत सर्व उपायांचा वापर केला जात नाही तोपर्यंत फाशी दिली जाऊ शकत नाही. फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी उशीर करण्यासाठी दोषींकडून सर्व युक्त्या अवलंबल्या जात असल्याचे पीडितेच्या वकिलाने सांगितले.