उद्यापासून Huawei Band 4 चा सेल, कुठून कराल खरेदी?
9 दिवसांपर्यंत टिकणारी बॅटरी आणि ‘स्लीप डिसॉर्डर डायग्नॉसिस’ यांसारखे दमदार व आवश्यक फीचर्स
by लोकसत्ता ऑनलाइनHuawei कंपनीने काही दिवसांपूर्वी ‘विअरेबल सेगमेंट’मध्ये नवीन डिव्हाइस Huawei Band 4 लाँच केला. उद्यापासून हे फिटनेस बँड विक्रीसाठी इ-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. हे फिटनेस बँड सर्वप्रथम गेल्या वर्षी चीनमध्ये लाँच केले होते. यामध्ये 0.96-इंच कलर डिस्प्ले आहे. याशिवाय 5ATM वॉटर रेसिस्टंस, 9 दिवसांपर्यंत टिकणारी बॅटरी आणि ‘स्लीप डिसॉर्डर डायग्नॉसिस’ यांसारखे फीचर्सही आहेत. याद्वारे युजर्स आपली लाइफस्टाइल ट्रॅक करु शकतात. यात जवळपास नऊ एक्सरसाइज मोड असून त्यात ‘आउटडोर रनिंग’ ते फ्री-ट्रेनिंगचा समावेश आहे. तसेच, या बँडमध्ये फिटनेस ट्रॅकिंग आणि ‘हार्ट रेट मॉनिटरिंग’ यांसारखे फीचर्सही आहेत.
मोठा कलर टच स्क्रीन डिस्प्ले असलेल्या या फिटनेस बँडमध्ये 2.5D ‘राउंडिंग एज’ आणि ‘ओलिओफोफिक कोटिंग’ असलेले पॅनल आहे. त्यामुळे हा बँड दिसायला आकर्षक दिसतो. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर याची बँटरी नऊ दिवसांपर्यंत टिकते असा दावा कंपनीने केलाय. कंपनीच्या फिटनेस बँडमध्ये युजर्सना म्युझिक कंट्रोल आणि कॅमेरा कंट्रोल यांसारखे फीचर्सही आहेत. हा बँड फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावरुन खरेदी करता येईल.
या फिटनेस ट्रॅकर बँडमध्ये फंक्शनल डिझाइनमध्ये बिल्ट-इन युएसबी इन-लाइन चार्जर आहे. शाओमीच्या Mi Band आणि Honor Band 5i सोबत Huawei Band 4 ची थेट टक्कर असेल. कंपनीने या बँडची किंमत 1,999 रुपये ठेवली असून केवळ ग्रेफाइट ब्लॅक या कलरमध्येच हा बँड उपलब्ध असेल.