निर्भयाच्या दोषीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिला दणका; याचिका फेटाळली
सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन असल्याचा दावा करणारी याचिका फेटाळल्याविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पवनने पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
by ऑनलाइन लोकमतठळक मुद्दे
- गेल्या आठवड्यात दोषी पवनच्या अल्पवयीन असल्याच्या दावा करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती.
- पवन गुप्ताची तो अल्पवयीन असल्याबाबतची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची तो अल्पवयीन असल्याबाबतची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे न्यायालयाने पवनला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. गेल्या आठवड्यात दोषी पवनच्या अल्पवयीन असल्याच्या दावा करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन असल्याचा दावा करणारी याचिका फेटाळल्याविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पवनने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ती याचिका देखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
२०१२ दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी पवन कुमार गुप्ता यांनी दाखल केलेली याचिका (एसएलपी) फेटाळून लावली होती. कारण न्यायालयाला या प्रकरणात कोणतेही नवीन आधार मिळाले नाही. पवन यांनी असा दावा केला होता की, तो गुन्हा घडला त्यावेळी तो अल्पवयीन होता आणि दिल्ली उच्च न्यायालयाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते. निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा टाळण्यासाठी आरोपी पवन गुप्ता याने नवीन युक्ती अवलंबून याचिका दाखल केली होती. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. वास्तविक पवन गुप्ता असा दावा करतो की, घटनेच्या वेळी तो अल्पवयीन होता.