IND Vs NZ, 4th T20I: अखेरच्या षटकात सामना फिरला, पुन्हा 'Super Over'चा थरार

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या चौथ्या ट्वेंटी-20 सामना नाट्यमय झाला.

by
https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/munro-tim_202001363459.jpeg
IND Vs NZ, 4th T20I: अखेरच्या षटकात सामना फिरला, पुन्हा 'Super Over'चा थरार

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या चौथ्या ट्वेंटी-20 सामना नाट्यमय झाला. मनीष पांडेच्या नाबाद अर्धशतकी खेळीला किवींच्या कॉलीन मुन्रोनं तुफान फटकेबाजीनं उत्तर दिलं. भारतीय क्षेत्ररक्षकांनी मोक्याच्या क्षणाला झेल सोडल्यानंही सामना किवींच्या पारड्यानं झुकला. किवींनी मालिकेतील पहिल्या विजयाची नोंद करताना टीम इंडियाच्या घोडदौडीला ब्रेक लावला. मुन्रोनंतर टीम सेइफर्टनं दमदार खेळ केला. त्याच्या अर्धशतकी खेळीला रॉस टेलरची तुल्यबळ साथ मिळाली. अखेरच्या षटकात टेलरच्या विकेटनं सामन्यात चुरस निर्माण केली. टीम सेइफर्टही धावबाद झाला.  त्यानंतर पाचव्या चेंडूवर डॅरील मिचेलही झेलबाद झाला. अखेरच्या चेंडूवर एकच धाव घेतल्यानं सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

सामन्याला सुरुवात होण्याच्या अर्ध्यातासापूर्वी  न्यूझीलंड कर्णधार केन विलियम्सननं दुखापतीमुळे माघार घेतील. त्यामुळे टीम साउदीच्या नेतृत्वाखाली किवी मैदानावर उतरले. मालिकेत 0-3 अशा पिछाडीवर असलेल्या न्यूझीलंडनं चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात जबरदस्त कमबॅक केले. इश सोढीची फिरकी अन् मिचेल सँटनरच्या अप्रतिम झेलच्या जोरावर यजमानांनी टीम इंडियाच्या धावांवर लगाम लावला. लोकेश राहुलनं फॉर्म कायम राखला, परंतु त्याला अन्य फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. मनीष पांडेनं अखेरच्या षटकांत खिंड लढवताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. 

https://scontent-lht6-1.cdninstagram.com/v/t51.2885-15/e15/82915622_2722139284548131_523550689949972578_n.jpg?_nc_ht=scontent-lht6-1.cdninstagram.com&_nc_cat=1&_nc_ohc=us3v4wtWrm0AX_PmsVO&oh=9e8407ef1fde0a273dc11540131b9618&oe=5EC5FBA4
An enterprising fifty from Manish Pandey helps India post 165/8 after early wickets. Can New Zealand chase this down? #NZvIND

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीला येण्याची संधी मिळालेल्या संजू सॅमसननं निराश केले. श्रेयस अय्यर आज अपयशी ठरला, तर शिवम दुबेला आज मोठी खेळण्याची संधी होती, तीही त्यानं गमावली. लोकेश राहुलनं जबाबदारीनं खेळ केला. त्यानं ट्वेंटी-20 4000 धावांचा पल्ला पार केला. लोकेशनं 26 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार खेचून 39 धावा केल्या. इश सोढीनं 4 षटकांत 26 धावांत तीन विकेट्स घेतल्या. सँटनरनेही 4 षटकांत 26 धावा देत एक विकेट घेतली. त्यानंतर मनीष पांडे आणि शार्दूल ठाकूर यांनी टीम इंडियाची लाज राखली. मनीषनं अखेरच्या षटकांत साजेसा खेळ करताना संघाला 8 बाद 165 धावांपर्यंत मजल मारून दिली. हॅमिश बेन्नेटनंही दोन केट्स घेतल्या. मनीष 37 चेंडूंत 3 चौकारांसह 50 धावांवर नाबाद राहिला. 

https://scontent-lht6-1.cdninstagram.com/v/t51.2885-15/e15/82433938_483494702314328_6760840151534200917_n.jpg?_nc_ht=scontent-lht6-1.cdninstagram.com&_nc_cat=1&_nc_ohc=Vfvo0RmkDDgAX_pLU4C&oh=7cce80ac1e74afdd4dcadfb107743a56&oe=5ECB89EC
Fifty for Munro! 🎉 This is the 14th time he has passed 50 in T20Is 👏

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडचा अपयशाचा पाढा कायम राहिला. मार्टीन गुप्तीलचा ( 4) अडथळा दूर करतान जसप्रीत बुमराहनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. किवींनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 39 धावा केल्या. पण, टीम सेइफर्ट आणि कॉलीन मुन्रो यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. मुन्रोनं 38 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. किवींनी पहिल्या 10 षटकांत 1 बाद 79 धावा केल्या होत्या. 12व्या षटकात मुन्रो धावबाद झाला. विराट कोहलीच्या डायरेक्ट हिटनं टीम इंडियाला दुसरे यश मिळवून दिले. मुन्रोनं 47 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार ठोकून 64 धावा केल्या.

https://scontent-lht6-1.cdninstagram.com/v/t51.2885-15/e15/83124169_590941671458518_1548314394217679696_n.jpg?_nc_ht=scontent-lht6-1.cdninstagram.com&_nc_cat=1&_nc_ohc=s8rW6FAi_UIAX8KenKj&oh=b16b6c55917ebf4707293ec14909a870&oe=5EDBE7AA
A second T20I fifty for Tim Seifert! 🎉 He took just 3️⃣2️⃣ balls to reach the landmark 😮

अन् सामन्याला नाट्यमय कलाटणी
किवींना 51 चेंडूंत 71 धावांची गरज असताना मुन्रो धावबाद झाला. त्यानंतर युजवेंद्र चहलनं टॉम ब्रुसला शून्य धावावर त्रिफळाचीत केले. त्यामुळे एकेकाळी फ्रंटसीटवर बसलेला किवी संघ पुन्हा बॅकसीटवर गेला. त्यानंतर किवी फलंदाजांवर दडपण आलेलं पाहायला मिळालं. येथे टीम इंडियाच्या गोलंदाजांनी समजुतीनं गोलंदाजी केली असती तर सामन्याला कलाटणी देता आली असती. त्यात नवदीप सैनीकडून सेइफर्टचा झेल सुटला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर बुमराहनंही त्याचाच झेल सोडला. त्यानंतर किवी फलंदाजांनी सामना आपल्या बाजूनंच ठेवला. पण, सामन्याच्या अखेरच्या षटकात शार्दूल ठाकूरनं दुसऱ्या चेंडूवर रॉस टेलरला बाद करून सामन्यात चुरस कायम राखली. श्रेयस अय्यरनं अप्रतीम झेल टिपला. त्यानंतर सेइफर्टही धावबाद झाला. त्यामुळे सामन्याला नाट्यमय कलाटणी मिळाली. पाचव्या चेंडूवर डॅरील मिचेल झेलबाद झाला. अखेरच्या चेंडूवर किवींना दोन धावांची गरज असताना मिचेल सँटनरला एकच धाव घेता आली आणि सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये गेला. 

https://scontent-lht6-1.cdninstagram.com/v/t51.2885-15/e35/83029958_2506550066232151_5544805920300833194_n.jpg?_nc_ht=scontent-lht6-1.cdninstagram.com&_nc_cat=1&_nc_ohc=Ncx0V6macUkAX9CB-fl&oh=efc78fccaa4bcf08a04b89c79eb1149d&oe=5EC43FCA
U.N.B.E.L.I.E.V.A.B.L.E 😱😱 We are going for another Super Over 😯😯 Who is winning this now? 🇮🇳🇮🇳 #TeamIndia #NZvIND

अखेरच्या षटकातील नाट्य
पहिला चेंडू - रॉस टेलर ( 24) झेलबाद
दुसरा चेंडू - डॅरील मिचेलनं चौकार मारला
तिसरा चेंडू - टीम सेइफर्ट धावबाद
चौथा चेंडू - एक धाव
पाचवा चेंडू - मिचेल झेलबाद
सहवा चेंडू - सँटनर धावबाद