जमिनीखाली जे काही दिसलं ते पाहून अमेरिकन लोकांना बसला धक्का, सिनेमात तर कितीदा पाहिलं असेल!31 Jan 2020, 10:34अमेरिकेतून नेहमीच आश्चर्यकारक गोष्टी समोर येत असतात. आता येथील अधिकाऱ्यांना आतापर्यंत सर्वात मोठा भुयारीमार्ग शोधल्याचा दावा केला आहे. या भुयारीमार्गाचा वापर तस्करीसाठी केला जात होता.जमिनीखालील या मार्गातील एअर व्हेंटिलेशन, रेल्वे ट्रॅक आणि लिफ्टसारखी सुविधा पाहून अधिकारी आणि लोकही आश्चर्यचकित झाले आहेत.अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी या भुयारीमार्गात रेल्वे ट्रॅक, लिफ्ट आणि एअर व्हेंटिलेशन पाहिलं तेव्हा त्यांना धक्का बसला. पण हे अजून समजू शकले नाही की, हा भुयारीमार्ग कुणी तयार केला.यूएस-मेक्सिको बॉर्डरवर आढळून आलेल्या या भुयारीमार्ग प्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे हा भुयारीमार्ग फुटबॉलच्या १४ ग्राउंडच्या बरोबरीचा आहे.ऑगस्टमध्ये या भुयारीमार्गाबाबत माहिती मिळाली होती आणि त्यानंतर अमेरिकी अधिकाऱ्यांनी याचं मॅपिंग केलं. त्यातून समोर आलं की, या भुयारीमार्गाची खोली ७० फूट आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा भुयारीमार्ग असल्याचं बोललं जात आहे.हा भुयारीमार्ग कॅलिफोर्नियातील सॅन डीएगोमध्ये उघडतं. तर याचं प्रवेश द्वार मेक्सिकोच्या तिजुआना शहरातील एका इंडस्ट्रीअल साइटमध्ये आहे.या भुयारीमार्गात ड्रेनेज सिस्टीमही आहे. याआधीही अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर अनेक भुयारीमार्ग आढळून आले आहेत.याआधीही अनेक भुयारीमार्ग सीमेवर सापडले, पण ते इतके खोल आणि लांब नव्हते.या मार्गाने ड्रग्सची तस्करी केली जात असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.मेक्सिको हे ड्रग्सचं मोठं केंद्र मानलं जात असून या भुयारातून ड्र्ग्स एका देशातून दुसऱ्या देशात पाठवत होते.एका देशातून दुसऱ्या देशात पोहचवणारा हा सर्वात मोठा भुयारी मार्ग मानला जात आहे.