सुर्याचा पृष्ठभाग की लोणावळा चिक्की?; नेटकऱ्यांना पडला प्रश्न
"ही मानवाने घेतलेली सर्वात मोठी झेप आहे"
by लोकसत्ता ऑनलाइनसुर्याच्या पृष्ठभागाचे सर्वात जवळून काढलेले फोटो अमेरिकेमधील एका संशोधन संस्थेने नुकतेच जारी केले. डॅनियल के. अॅन्यूई सोलार टेलिस्कोपने (डीकेआयएसटी) २९ जानेवारी रोजी जारी केलेले हे फोटो सध्या चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये सुर्याच्या पृष्ठभागावर मानवी पेशींसारखी रचना असल्याचे दिसून येत आहे. या पेशींसारख्या रचनांचा आकार टेक्सास राज्याइतका मोठा असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. सुर्याच्या पृष्ठभागावर वायू आणि प्लाझमाच्या ज्वलनामुळे हे आकार तयार होतात असं संशोधकांचे म्हणणं आहे.
डीकेआयएसटी ही जगातील सर्वात शक्तीशाली दुर्बिण आहे. “हे फोटो म्हणजे गॅलिलिओच्या काळापासून आतापर्यंत सुर्याच्या अभ्यास करताना मानवाने घेतलेली ही सर्वात मोठी झेप आहे. हा खूप मोठा शोध आहे,” असं मत संशोधकांपैकी एक असणाऱ्या प्राध्यापक जेफ कुहेन यांनी व्यक्त केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
मात्र हे फोटो समोर आल्यानंतर भारतीयांना एका पदार्थाची आठवण झाली आहे. सुर्याच्या पृष्ठभागाचे फोटो हे शेंगदाणा चिक्कीसारखे दिसत असल्याचे मत अनेक भारतीयांनी ट्विटवरुन नोंदवले आहे. काहींनी तर सूर्य चिक्कीसारखा असल्यानेच हनुमानाने सूर्य खाल्ल्याचेही पोस्ट केलं आहे.
शेंगदाणा चिक्की
लोणावळा चिक्की सुर्यावर पण मिळू लागली?
आम्ही याला मराठीत…
लोणावळा चिक्की…
…म्हणून हनुमानाने सूर्य खाल्ला
याच कारणामुळे…
सेम टू सेम…
हे तर सोनं
सुर्याचा पृष्ठभाग बनवताना भारतीय महिला
झूम करुन बघा
दया कुछ तो गडबड है
एकीकडे सुर्याच्या या फोटोंवरुन भारतीयांना चिक्कीची आठवण झाल्याने ते यावरुन मस्करी करत असले तरी संशोधकांच्या दृष्टीने हे फोटो खूप महत्वाचे आहेत. या फोटोंमुळे सुर्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांना मदत होणार आहे. तसेच सुर्याचे अंतरंग जाणून घेण्याच्या दृष्टीनेही हे फोटो फायद्याचे ठरणार आहेत.