https://images.loksatta.com/2020/01/Mohammad-Shami-1.jpg?w=830

IND vs NZ: चौथ्या सामन्याआधी मोहम्मद शामीने मुलीसाठी लिहिला खास संदेश

मोहम्मद शामीला मुलीची आठवण सतावत आहे

by

न्यूझीलंडविरोधातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-० ची विजयी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील चौथा सामना आज वेलिंग्टन येथे हाणार आहे. तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि मोहम्मद शामी विजयाचे शिल्पकार ठरले. मालिकेच्या निमित्ताने न्यूझीलंडमध्ये असल्या कारणाने मोहम्मद शामीला मुलीची आठवण सतावत आहे. मोहम्मद शामीने इन्स्टाग्रामवर मुलीचा फोटो शेअर केला असून सोबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुलीचा साडीमधील गोंडस फोटो शेअर करत मोहम्मद शामीने लिहिलं आहे की, “खूप सुंदर दिसत आहेस बाळा. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. देव तुझं भलं करो. लवकरच भेटू”. फोटोमध्ये शामीची मुलगी आयरा साडी नेसलेली असून खूप गोड दिसत आहे. हा फोटो वसंत पंचमीनिमित्त शाळेत आयोजित कार्यक्रमातील आहे. मोहम्मद शामी परदेशी दौऱ्यावर असताना अनेकदा सोशल मीडियावर मुलीचे फोटो शेअर करत असतो.

https://scontent-lht6-1.cdninstagram.com/v/t51.2885-15/e35/83345256_491959068362167_209867548774262074_n.jpg?_nc_ht=scontent-lht6-1.cdninstagram.com&_nc_cat=1&_nc_ohc=2etcrDqZckUAX8QkUU4&oh=99bae1e4d8b99893ff4a55588cba78ca&oe=5ECAB094
Looking so sweet beta love you so much 👨‍👧❤️❤️❤️❤️god bless you beta see you soon 💪🏻

तिसऱ्या सामन्याचा थरार
तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर १८० धावांचं आव्हान ठेवलं होतं. धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला विजयासाठी अखेरच्या षटकात ६ चेंडूत ९ धावांची गरज होती. तिसरा सामना न्यूझीलंडने जवळपास जिंकला होता. केन विल्यम्सन आणि रॉस टेलर मैदानात होते. पण शामीने भेदक गोलंदाजी करत पहिल्यांदा विल्यम्सनला बाद केले. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर एक धाव हवी असताना टेलरला बाद केले.

सुपर ओव्हरचा रोमांच
सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने विल्यम्सन आणि गप्तिल यांना पाचरण केले. लयीत नसलेल्या बुमराहने पहिल्या दोन चेंडूत दोन धावा दिल्या. त्यानंतर विल्यम्सयने एक षटकार आणि चौकार लगावत न्यूझीलंडची धावसंख्या वाढवली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर एक धाव घेतल्यानतंर सहाव्या चेंडूवर गप्तिलने चौकार मारल्यामुले न्यूझीलंडने १७ धावा केल्या. भारताने रोहित आणि राहुल यांच्यावर विश्वास दाखवला. पहिल्या चेंडूवर दोन आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत रोहितने राहुलला फलंदाजीवर आणले. राहुलने चौकार लगावून पुढच्या चेंडूवर एक धाव घेतली. भारताला दोन चेंडूत १० धावांची आवश्यकता असताना रोहितने साऊदीला दोन षटकार ठोकून भारताच्या विजयावर मोहोर उमटवली.