बॉलिवूड चित्रपटांमध्ये काही निवडक गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री प्रिती झिंटा. या अभिनेत्रीने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळ्याच प्रकारची भूरळ घातली होती. विविध भूमिकांना न्याय देणाऱ्या बॉलिवूडच्या या प्रिटी वुमनचा आज वाढदिवस आहे. ‘वीर-झारा’, ‘सलाम-नमस्ते’, ‘कल हो ना हो’ यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ही अभिनेत्री सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र तिचा सोशल मीडियावर चांगलाच वावर आहे. प्रिती केवळ कलाविश्वाशी निगडीत नसून तिचा क्रिकेटविश्वाशीही चांगला संबंध आहे. ती ‘किंग्स इलेव्हन पंजाब’ या टीमची सहमालकीन आहे. स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभ्या असणाऱ्या प्रितीने मात्र तिला मिळालेली ६०० कोटी रुपयांची संपत्ती घेण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येतं.
चित्रपट दिग्दर्शक कमल अमरोही यांच्या मुलाने म्हणजेच शानदार अमरोही यांनी प्रितीला दत्तक घेतल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांच्या मृत्युपूर्वी त्यांनी त्यांच्या संपत्तीमधील काही वाटा प्रितीच्या नावावर केला होता. या संपत्तीची एकूण किंमत ६०० कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं. मात्र प्रितीने हे संपत्ती घेण्यास नकार दिला. विशेष म्हणजे एकीकडे प्रितीच्या संपत्तीविषयीची चर्चा रंगत असतानाच एका मुलाखतीमध्ये तिने बोलत असताना “मला कोणीही दत्तक घेतलेलं नाही”, असं सांगितलं होतं. परंतु तरीदेखील तिच्याविषयी अनेक चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या.
Preity G ZintaSunshine after the rain is pure happiness 🤩 #weekendvibes #sunshine #ting 📸 @ashguptaslife
दरम्यान, स्वत:च्या निर्णयावर ठाम असणारी आणि स्पष्टपणे भूमिका मांडण्यासाठी प्रिती झिंटा ओळखली जाते. ऑनस्क्रिन ही अभिनेत्री जितक्या मनमोकळेपणाने वावरते त्याचप्रमाणे विविध मुलाखतींमध्ये ठाम मतं मांडण्यापासूनही प्रिती मागे हटत नाही. प्रितीने २००९ साली ऋषिकेशमधील एका अनाथाश्रमामधील ३४ मुलींना दत्तक घेतलं असून त्यांचा सगळा खर्च ती एकटी करते.