https://images.loksatta.com/2019/12/sana-marina.jpg?w=830
स्वीडन : सना मरीन या फिनलँड या देशाच्या तसेच जगातील सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या आहेत.

‘या’ महिलेने मिळवला जगातील सर्वात कमी वयाचा पंतप्रधान होण्याचा बहुमान!

केवळ २७ वर्षांच्या असताना त्यांनी सक्रीय राजकारणात पाऊल ठेवले होते.

by

जगातील सर्वात कमी वयाचा पंतप्रधान बनण्याचा बहुमान फिनलँडच्या माजी मंत्री सना मरीन यांना मिळाला आहे. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्या या देशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांच्या या विक्रमाबद्दल जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

माजी परिवहन असलेल्या सना मरीन या फिनलँडच्या राजकारणात सक्रीय असून इथल्या सोशल डेम्रोकेट पार्टीने रविवारी पंतप्रधानपदासाठी त्यांची निवड केली. त्यामुळे त्या केवळ या देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील सर्वांत तरुण पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांनी मावळते पंतप्रधान एन्टी रिने यांची जागा घेतली आहे. एका आंदोलनावरुन रिने यांच्या पक्षाचा त्यांच्या सहयोगी पक्षाने पाठींबा काढून घेतला होता, त्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या जागी सना मरीन यांची निवड झाली. जनसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.

सना मरीन (वय ३४) या जगातील सर्वाधिक तरुण राष्ट्रप्रमुख बनल्या आहेत. त्यांच्यानंतर युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सी होन्चारुक (वय ३५) हे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. इतक्या कमी वयात एका राष्ट्राचे प्रमुखपद मिळवण्याऱ्या मरीन माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, “मी कधीही इतक्या कमी वयात मोठा राजकीय पल्ला गाठण्याचा तसेच पंतप्रधान होईल असा विचार केला नव्हता.” केवळ २७ वर्षांच्या असताना त्यांनी सक्रीय राजकारणात पाऊल ठेवले होते. त्यांचे लहानपण खूपच कष्टात गेले. आर्थिक चणचण असतानाही आपल्या कुटुंबातील हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या सना पहिल्या सदस्या ठरल्या होत्या.

सना यांचे पालनपोषण त्यांच्या आईनेच केले आहे. त्यांच्या आईने एका महिलेशी लग्न केले होते, त्यानंतर ते विभक्तही झाले. सना यांचेही लग्न झालेले असून त्यांना एक छोटी मुलगी आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी सना या फनलँडच्या सोशल डेमोक्रेट पार्टीच्या सरकारमध्ये परिवहन मंत्री राहिल्या आहेत. सना मरीन यांच्या वयाच्या जवळपास असणारे अनेक राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. यामध्ये न्यूझिलंडच्या पंतप्रधान जैकिंडा आर्डेन (वाय ३९) आणि उत्तर कोरियाचे किम जोंग-उन (वय ३५) यांचाही समावेश आहे.