https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/firing-160923333_201912336209.jpg
हळदीतील वादातून सराईत गुन्हेगाराचा हवेत गोळीबार

हळदीतील वादातून सराईत गुन्हेगाराचा हवेत गोळीबार

कोंढव्यातील घटना, दोन्ही गटातील २५ जणांना अटक

by

ठळक मुद्दे

पुणे : हळदी समारंभात मद्यपान करुन आल्याने हाकलून दिल्याच्या रागातून झालेल्या वादात कोंढव्यात सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली़. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिली असून कोंढवापोलिसांनी एका गटातील २१ व दुसऱ्या गटातील चौघांना अटक केली आहे़. विनोद चिमुला असे हवेत गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे़. 
याप्रकरणी सलमा सलीम शेख (वय ३६, रा़ अंतुलेनगर, येवलेवाडी) यांनी कोंढवापोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. त्यावरुन कोंढवा पोलिसांनी २१ जणांना अटक केली आहे़. तर, रवि धांडेकर च्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांना अटक केली आहे़.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी याचा मित्र विशाल मेश्राम याच्या बहिणीचे हळदी समारंभाचा कार्यक्रम ७ डिसेंबरला होता़. यावेळी रवी धांडेकर मद्यपान करुन आला होता़. दारुच्या नशेत तो नाचायला लागल्याने  मोहसीन आणि विशाल यांनी त्याला निघून जाण्यास सांगितले़. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता़. या रागातून दुसºया दिवशी रविवारी रात्री नऊ वाजता सर्व जण मोहसीन याच्या घरी गेले़. त्यावेळी तो पाहुण्यांना सोडविण्यासाठी पुणे स्टेशनला गेला होता़. त्यांनी बिबवेवाडी येथील काही मुलांनाही ते घेऊन आले होते़. विशाल व मोहसीन न सापडल्याने त्यांनी वस्तीतील मुलांना मारहाण केली़. हिंमत असेल तर ये, अशी धमकी दिली़. याची माहिती मोहसीन शेख, विशाल मेश्राम हे अजय जमसंडी याला आमच्या वस्तीमधील मुलांना का मारले अशी विचारणा करण्यास रविवारी रात्री गेले होते़. त्यावेळी तेथे स्वप्नील धांडेकर, रवि धांडेकर, विनोद चिंमुला व त्यांचे १० ते १५ साथीदार आले़. त्यांनी मोहसीन शेख यास लाकडी दांडके, कोयता, लोखंडी रॉडने डोक्यात, शरीरावर वार करुन गंभीर जखमी केले़ त्याला सोडविण्यास आलेल्या सनी शिंदे, शाकीर शेख, अकबर शेख, श्रीदेवी मेश्राम यांनाही मारहाण करुन गंभीर जखमी केले़. यावेळी दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली़ हे पाहून स्वप्नील याच्याकडील पिस्तुल घेऊन विनोद चिमुला याने हवेत गोळीबार केला़. गोळीबाराचा आवाज ऐकून सर्व जण पळून गेले़ . या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़. कोंढवा पोलिसांनी अजय जमसंडीसह २१ जणांना अटक केली आहे़. त्यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. सध्या मोहसीन शेख, श्रीदेवी मेश्राम यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़.
 त्यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार अकबर शेख, शाकीर शेख, सनी शिंदे, अदित्य पवार यांना अटक केली आहे़. या घटनेनंतर कोंढवा, येवलेवाडी परिसरातील बंदोबस्तात पोलिसांनी वाढ केली होती़.