https://images.loksatta.com/2019/12/Satara-Accident.jpg?w=830

सातारा: वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि शिवशाही बसचा भीषण अपघात, ३३ जण जखमी

पसरणी घाटात हा भीषण अपघात झाला आहे

by

सातारा जिल्ह्यातील पसरणी घाटात ट्रॅव्हल्स आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला असून ३३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पसरणी घाटात हा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाबळेश्वरहून वाईला जाणारी ट्रॅव्हल्स पसरणी घाटात उलटून ५० फूट उतारावरून घसरत जाऊन वाईहुन महाबळेश्वरला जाणाऱ्या शिवशाही बसवर आदळल्याने हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी वाईमधील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.