https://images.loksatta.com/2019/10/SBI.jpg?w=830

SBI कडून एमसीएलआरवर ०.१० टक्क्यांची कपात, गृह, वाहन कर्ज स्वस्त

चालू आर्थिक वर्षातील एमसीएलआरमधील ही सलग आठवी कपात आहे.

by

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडवर आधारीत एमसीएलआरच्या कर्ज दरात ०.१० टक्क्यांनी कपात केली आहे. १० डिसेंबरपासून नवीन दर लागू होणार आहेत. यामुळे एसबीआयच्या एमसीएलआरशी संबंधित असलेली गृह, वाहन आणि अन्य कर्ज स्वस्त होणार आहेत.

चालू आर्थिक वर्षातील एमसीएलआरमधील ही सलग आठवी कपात आहे. एसबीआय देशातील स्वस्तात कर्ज पुरवठा करणारी बँक असून एमसीएलआरच्या कपातीमागे ग्राहकांना फायदा पोहोचवण्याच्या उद्देश असल्याचे एसबीआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मागच्या आठवडयात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो तसेच रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो दर ५.१५ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ४.९० टक्के कायम ठेवला आहे.