https://images.loksatta.com/2019/12/Papa.jpg?w=830
आलिया भट्ट आणि महेश भट्ट

Video: तो प्रश्न ऐकून महेश भट्ट यांचा पारा चढला आणि ते मोठ्याने ओरडू लागले

अभिनेत्री आलिया भट्टही या कार्यक्रमाला उपस्थित होती

by

प्रसारमाध्यमांसमोर कलाकारांनी चीडचीड करणे किंवा संतापणे काही नवीन राहिलेले नाही. अनेकदा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कलाकार संताप व्यक्त करताना दिसतात. असंच काहीसं झालं निर्माते आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याबरोबरच. एका पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर महेश भट्ट इतके चिडले की ते जोराजोरात आरडाओरड करु लागले. आपल्या वडिलांचा हा संताप पाहून कार्यक्रमाला उपस्थित असलेली अभिनेत्री आलिया भट्टनेही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आलियाच्या बोलण्याकडे महेश भट्ट यांनी दूर्लक्ष करतच उत्तर दिलं.

आलियाची बहीण आणि महेश भट्ट यांची थोरली कन्या शाहीन भट्ट यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. ‘आय हॅव नेवर बीन (अन)हॅपीयर’ या शाहीन यांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला संपूर्ण भट्ट कुटुंब उपस्थित होतं. आलिया, शाहीन, पूजा आणि महेश भट्ट यांच्यासोबत त्यांची पत्नी सोनी राजदानही मंचावर उपस्थित होत्या. पुस्तकाचा विषय असणाऱ्या मानसिक तणाव आणि मानसिक स्वास्थ या विषयावर चर्चा सुरु असताना महेश भट्ट यांना एक प्रश्न विचारण्यात आला.

मनोचिकित्सेमध्ये मानसिक तणावाला काही उत्तरे आहेत का असा प्रश्न मेहश भट्ट यांना विचारण्यात आला तेव्हा अचानक त्यांचा पारा चढला. “अशा प्रश्नांना उत्तरे नसतात. जे या प्रश्नांना उत्तर आहेत असा दावा करतात ते केवळ दिखावा करत असतात. याच दाव्यांच्या आधारे ते स्वत:च्या पूर्ण संस्था सुरु करतात. अशा संस्थांमध्ये जाणाऱ्यांवर हे लोक आपली उत्तरे लादतात,” असं उत्तर महेश भट्ट यांनी अगदीच चिडक्या स्वरात ओरडून दिले. त्यांचा हा संताप पाहून मंचाच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या आलियाने काळजीच्या स्वरात ‘पापा.. पापा… ओरडू नका’ असं म्हणत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. “मी असं काहीतरी होईल याचा मी तुम्हाला अंदाज दिला होता,” असं आलिया पत्रकाराकडे बघून म्हणाली.

When daddy gets angry. #maheshbhatt got emotional during #shaheenbhatt book launch #viralbhayani @viralbhayani

“एखाद्या लहान मुलीने अशापद्धतीच्या मानसिक आजाराने ग्रासलेल्या जगामध्ये स्वत:ला समावून घ्यावं अशी अपेक्षा मी नाही करु शकतं. ज्या समाजामध्ये क्रूरतेला कायदेशीररित्या मान्यता आहे त्या समाजात मी लहान मुलीवर हे बंधन घालू शकत नाही,” असंही पुढे महेश भट्ट म्हणाले. पुढे आलियाकडे बघत त्यांनी, “तुझ्यामध्ये काहीच चुकीचं नाहीय. उलट जो मानसोपचारतज्ज्ञ तुला या जगामध्ये जुळवून घेण्याचा सल्ला देतो तोच आजारी आहे,” असं म्हटलं.

सामान्यपणे महेश भट्ट एखाद्या प्रश्नाचे उत्तर देऊन गप्प बसतात. मात्र मानसोपचाराबद्दलचा प्रश्न थेट त्यांच्या मुलींशी संबंधित असल्याने त्यांचा पारा चढला. काही दिवसांपूर्वी आलिया आपल्या बहिणीला होत असणाऱ्या मानसिक त्रासाचे वर्णन करताना रडत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाला होता.