https://images.loksatta.com/2019/12/Banana.jpg?w=830
८५ लाखांचं केळं

Video: बापरे… त्याने खाल्लेल्या केळ्याची किंमत आहे ८५ लाख ३६ हजार रुपये

जाणून घ्या नक्की काय आहे हे प्रकरण

by

काही महिन्यांपूर्वी चंदीगढमधील एका हॉटेलने अभिनेता राहुल बोसकडून दोन केळ्यांसाठी चक्क ४४२ रुपये आकारल्याचे वृत्त समोर आले होते. हा प्रकार चंदीगढमधील जेडब्ल्यु मेरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये घडला होता. त्यानंतर सोशल मिडियावर बरीच चर्चा झाली होती. मात्र आता या बिलालाही मागे टाकणारे एक वृत्त समोर आले आहे. अमेरिकेमध्ये दोन केळी केळी प्रत्येकी ८५ लाख ३६ हजार रुपयांना (म्हणजेच एक लाख वीस हजार डॉलर) विकली गेली. विशेष म्हणजे तिसरं केळं एका व्यक्तीने खाल्लं.

अमेरिकेमधील मियामी प्रदेशामध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या आर्ट बेसेलने या संग्रहालयामध्ये हे ८५ लाखांचं केळं प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे हे केळं एक कलाकृतीचा भाग असल्याने त्याच्यासाठी इतकी मोठी रक्कम मोजण्यात आली. एका चंदेरी रंगाच्या चिकटपट्टीने भिंतीवर चिटकवण्यात आलेल्या या केळ्याचे फोटो मागील काही दिवसांपासून जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरले होते. अशा प्रकारच्या तीन कलाकृती संग्रहालयामध्ये होत्या. त्यापैकी दोन कलाकृती विकल्या गेल्या. मात्र शनिवारी एका शिल्पकाराने शेवटच्या कलाकृतीमधील ८५ लाखांचं केळं खाल्लं. या शिल्पकारानेच केळं खातानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. डेव्हिड डटूना असं या शिल्पकाराचं नाव आहे. जगभरात चर्चेत असलेल्या या कलाकृतीमधील केळं डेव्हिडने भिंतीवरील चिकटपट्टी काढून खाऊन टाकलं. याचा व्हिडिओही डेव्हिडने शूट केला. हा व्हिडिओ पोस्ट करताना डेव्हिडिने “भूक लागलेला कलाकार… मी सादर केलेली कला. मला मॉरीझिओ कॅटलन यांची ही कलाकृती खूपच आवडली आणि ती कलाकृती खातानाही मला मजा आली. त्याची चव खूपच छान होती,” असं म्हटलं आहे.

“Hungry Artist” Art performance by me 🙂 I love Maurizio Cattelan artwork and I really love this installation It’s very delicious 🙂 #artbasel #artbaselmiamibeach #daviddatuna #Eatingabanana #Mauriziocattelan #Hungryartist

मात्र डेव्हिड यांनी ही कलाकृती खाऊन कोणताही गुन्हा केलेला नाही असं संग्रहालयाच्या संचालिका लूसीएन टेरस यांनी स्पष्ट केलं आहे. ”हे केळं म्हणजे केवळ एक संकल्पना आहे. डेव्हिडने केळं खालल्यानंतर १५ मिनिटांमध्येच चिकटपट्टीने त्या जागी दुसरं केळं चिटकवण्यात आलं आहे,” असं टेरस म्हणाल्या. इटलीमधील लोकप्रिय शिल्पकार मॉरीझिओ कॅटलन यांनी ही कलाकृती बनवली असून. या कलाकृतीचे नाव “कॉमेडियन” असं ठेवण्यात आलं आहे. याआधी कॅटलन यांनी ब्रिटनमधील एका कलाप्रदर्शनामध्ये सोन्याचे कमोड सादर केले होते. हे कमोड प्रदर्शनामधून चोरीला गेले होते.

नक्की काय आहे या कलाकृतीचा अर्थ

पॅरिसियन आर्ट गॅलरीचे मालक इमॅन्युले पॅरोटीनं यांनी या कलाकृतीचा अर्थ आपल्या फेसबुक पोस्टमध्ये समजवून सांगितला आहे. “केळं हे जागतिक व्यापार आणि विनोदबुद्धीचे प्रतीक आहे. म्हणून या कलाकृतीला ‘कॉमेडियन’ असे नाव देण्यात आले आहे. या केळाच्या तुकड्यांची किंमत ही त्या वस्तुला दिलेले महत्त्व ठरवते. कॅटेलन आपल्या हॉटेलच्या खोलीत एक शिल्प बनवण्याचा विचार करीत होते. या शिल्पामधून आपल्याला नेहमी प्रेरणा मिळावी अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी प्रथम तांब्यापासून केळं तयार केलं. यानंतर, खऱ्या केळासारखा त्याला टेप लावून चिटकवलं. त्यापासूनच प्रेरणा घेऊन खरं केळं चिटकवण्यात आलं,” असं इमॅन्युले म्हणतात.