https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/bhghons_201912336090.jpg
50 फूट खोल विहिरीत पडला घोणस साप, सुटकेसाठी वापरली भन्नाट आयडिया

50 फूट खोल विहिरीत पडला घोणस साप, सुटकेसाठी वापरली भन्नाट आयडिया

घटना सविस्तर - बोरामणी ता दक्षिण सोलापूर 

by

सोलापूर - मल्लिनाथ बिराजदार ह्यांनी फोन वरुन वन्यजीव प्रेमी राहुल शिंदे माहिती दिली की दोन दिवसापासून विहिरीत एक साप पडला असून तो बाहेर पडु  शकत नाही. शिंदे ह्यांनी तात्काळ घटनचे माहिती वन विभागास कळविली. वनरक्षक बापू भुई व वन्यजीव प्रेमी राहुल शिंदे, नागनाथ हिंगमिरे, सुनिल अरळ्ळीकट्टी, औदुंबर गेजगे,मल्लिकार्जुन धुळखेडे, श्रीकांत बनसोडे, अभय फुले, प्रवीण जेऊरे, मुकुंद शेटे व वाहनचालक कृष्णा निरविणे घटनास्थळी दाखल झाले. 

५० फूट खोल विहिरी मध्ये उतरण्यासाठी कोणता मार्ग नव्हता. विहिर तळास फक्त दोन फूट पाणी असल्याने व उभ्या कडा असल्याने घोणस सापास पाणीतुन बाहेर पडण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता.

ही वापरली भन्नाट आयडिया
बोरी झाडाचा मोठा फाटा कट करुन त्यास दोन्ही बाजूने दोन वेगवेगळ्या दोरी बांधण्यात आल्या. व दोन बाजूने सावकाश विहिरीमध्ये सोडण्यात आले. घोणस साप बोरीच्या फाट्यावर येताच सावकाश दोन्ही बाजूने फाटा उचलण्यात आला. साप विषारी प्रजातीचा असल्याने सर्वती काळजी घेण्यात आली होती. साप बाहेर येतात तसाच तो फाटा  सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यात आला. फाट्यावरुन घोणस खाली उतरून तिने निसर्गात मुक्त जीवन जगण्यासाठी दाट झाडीत निघून गेली व सर्व वन्यजीव प्रेमींच्या चेहरे  आनंदमय झाला.