https://images.loksatta.com/2019/12/Team-RR.jpg?w=830

IPL Video : राजस्थानने ‘अजिंक्य’ खेळाडू गमावला, आता पुढे काय?

'हे' दोन मुद्दे ठरणार राजस्थानसाठी महत्वाचे

by

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने सर्वांनाच बुचकळ्याच पाडणारी रणनिती अवलंबली आहे. गेली काही वर्ष संघाचं नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेला राजस्थानने दिल्लीच्या ताफ्यात दिलं. अजिंक्यच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ संघाचं नेतृत्व करणार आहे. अजिंक्यसोबत राहुल त्रिपाठी आणि अन्य महत्वाच्या खेळाडूंनाही राजस्थानने करारमुक्त केलं आहे.

मात्र अजिंक्यला दिल्लीच्या ताफ्यात दिल्यामुळे, राजस्थानला आगमी हंगामाच्या लिलावात काही मुद्द्यांकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. सलामीवीराची भूमिका बजावणारा अजिंक्य रहाणे नसल्यामुळे राजस्थान रॉयल्सला, अनुभवी सलामीचा फलंदाज शोधावा लागणार आहे. याचसोबत मधल्या फळीतल्या फलंदाजीची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्नही राजस्थानसमोर असणार आहे.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात २ वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आल्यानंतर राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन केलं आहे. त्यामुळे आगामी हंगामासाठी राजस्थान आपल्या संघात कोणत्या खेळाडूंना संधी देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा –  IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा महत्वाचा निर्णय, RCB च्या फलंदाजावर बोली लावण्याची शक्यता