https://images.loksatta.com/2019/11/tejas-jet.jpg?w=830

शत्रूवर प्रहार करण्यासाठी ‘तेजस’ होणार अधिक शक्तीशाली, बनवणार Mk-2 व्हर्जन

तेजस नजरेपलीकडच्या लक्ष्यावर प्रहार करण्यास सक्षम असेल.

by

तेजस (एमके-२) या फायटर विमानाच्या व्यावसायिक उत्पादनाला पुढच्यावर्षी फेब्रुवारी २०२० पासून सुरुवात होणार आहे. एॅरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे संचालक डॉ. गिरीश एस देवधरे यांनी ही माहिती दिली. तेजस हे स्वदेशी बनावटीचे फायटर विमान आहे.

तेजसचे एमके २ व्हर्जन शक्तीशाली रडारसह अत्याधुनिक सेन्सर्सनी सुसज्ज असणार आहे. या फायटर जेटच्या एव्हिऑनिक्स सिस्टिममध्ये सुधारणा करण्यात आली असून ते दृष्टीपलीकडच्या लक्ष्यावर प्रहार करण्यास सक्षम असेल. Mk-1 आणि Mk-1A पेक्षा तेजस Mk-2 ची इंधन टाकी मोठी असून त्यावरुन जास्त शस्त्रास्त्रे वाहून नेता येतील. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

इंडियन एअर फोर्स तेजस Mk-1 आणि Mk-2 व्हर्जनची १२३ विमाने विकत घेणार आहे. जुन्या झालेल्या फायटर विमानांच्या जागी स्वदेशी बनावटीची विमाने विकत घेणार असल्याचे आएएफकडून सरकारला सांगण्यात आले आहे. फ्रेंच बनावटीची मिराज-२००० आणि रशियन मेड मिग-२९ फायटर विमानांची जागा घेण्यासाठी तेजस Mk-2 ची निर्मिती करण्यात येणार आहे. बालाकोट एअर स्ट्राइकसाठी आयएएफने मिराज-२००० विमानांचा वापर केला होता. नियोजित कार्यक्रमानुसार तेजस Mk-2 चे पहिले उड्डाण २०२४ मध्ये अपेक्षित आहे.