https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/man-suicide-605009877777_201912335990.jpg
धक्कादायक ! पत्नीकडून घरगड्यासारखी वागणूक मिळत असल्याने पतीची आत्महत्या

धक्कादायक ! पत्नीकडून घरगड्यासारखी वागणूक मिळत असल्याने पतीची आत्महत्या

दोघांचा ४ वर्षापूर्वी झाला होता़ प्रेमविवाह

by

ठळक मुद्दे

पुणे : त्या दोघांनी प्रेमविवाह केला होता़. पण, मराठी संस्कृतीत ती सामावली गेली नाही़. नोकरीनिमित्त दोघे पुण्यात राहत असताना पत्नी स्वत:चे कपडे धुवायला लावून घरगड्यासारखे राबवत, नातेवाईक मुलीशी संबंध असल्याचा संशय घेऊन पत्नीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़.
प्रणय मिलिंद खुटाळ (वय २९, रा़ जिनिया बिल्डिंग, मगरपट्टा सिटी, हडपसर) या तरुणाचा नाव आहे़. याप्रकरणी प्रणय याची आई संगिता मिलिंद खुटाळ (वय ४९, रा़ लिंबोदा, ता़ हतोद जि़ इंदौर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ ही घटना मगरपट्टा येथील जिनिया बिल्डिंगमध्ये ७ नोव्हेंबर २०१९ रोजी घडली़. 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रणय हा मुळचा इंदौर येथील राहणार असून त्याची पत्नी कनिका ही भोपाळची राहणारी आहे़. दोघांचा ४ वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता़. त्यानंतर दोघेही पुण्यातील मगरपट्टा एका खासगी विमा कंपनीत कामाला होता़. तर, कनिका ही या परिसरातील एका आंतरराष्ट्रीय कंपनीतील मनुष्यबळ विकास विभागात कामाला होती़ मगरपट्टा येथील जिनियामध्ये फ्लॅट घेतला होता़. तेथे दोघेच राहायला होते़. दरम्यान, कनिका गर्भवती असल्याने सुमारे दीड वर्षापूर्वी तिने नोकरी सोडली़ तिला बाळही झाले़. 
संगिता खुटाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कनिका प्रणय याला स्वत:चे कपडे धुवायला सांगत असे़. त्याला घरातील कामे घरगड्यासारखे करायला सांगून मानहानी करीत असत़. तिच्या नावावर प्रॉपर्टी करण्यावरुन त्यांच्यात वाद होत असत़. बाळ लहान असल्याने कनिका सध्या घरीच होती़. त्याचा कामावरील तसेच नातेवाईक मुलीशी संबंध असल्याचा ती संशय घेत असत़. त्यावरुन त्याचा शारिरीक व मानसिक छळ करीत असत़. पत्नीच्या या छळाला कंटाळून प्रणय याने ७ नोव्हेंबर २०१९ रोजी घरातील बेडरुममध्ये पंख्यास बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़. त्याच्या मृत्युला त्याची पत्नी कारणीभूत असल्याचे संगिता खुटाळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे़. त्यावरुन हडपसर पोलिसांनी कनिका खुटाळ यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे़.