फिनलँडच्या सना मारिन बनल्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान
पंतप्रधान पदाची धुरा हाती घेताच त्यांनी विश्व विक्रम रचला आहे. त्या जगातील सर्वात तरुण पंतपधान बनल्या आहेत.
by ऑनलाइन लोकमतइकडे राजकारणात आमदार, खासदार होईपर्यंत साठी ओलांडावी लागत असताना केवळ 34 व्या वर्षी पंतप्रधान बनता येणे किती भाग्याचे असेल. होय, सना मारिन या फिनलँडच्या नव्या पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांचे वय केवळ 34 आहे. साऊली निनिस्तो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनाम दिल्यानंतर मारिनोंची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा होत्या.
पंतप्रधान पदाची धुरा हाती घेताच त्यांनी विश्व विक्रम रचला आहे. त्या जगातील सर्वात तरुण पंतपधान बनल्या आहेत. असे नाहीय की त्यांना थेट पंतप्रधानपदी बसविण्यात आले आहे. त्या याआधी परिवाहन आणि दळणवळण मंत्री राहिल्या आहेत. सर्वात तरुण पंतप्रधान बनण्याचा विक्रम युक्रेनचे पंतप्रधान आलेक्सी होन्चेरुक यांच्या नावे होता.
पंतप्रधान पदासाठी निवड झाल्यानंतर मारिन यांनी सांगितले की, मी कधीही वय आणि स्रीत्वाचा विचार केला नव्हता. मी केवळ राजकारणात येण्याची कारणे आणि मतदारांनी मला कशाला निवडून दिले आहे याचा विचार करते.
फिनलँडमध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. पोस्ट कर्मचाऱ्यांनी मोठा संप पुकारला होता. 700 कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याच्या निर्णयाने राजकीय संकट निर्माण झाले होते. यामुळे रिन्ने यांना पायऊतार व्हावे लागले होते. तर आंदोलनानंतर विश्वासार्हता गमावल्याने साऊली निनिस्तो यांनाही राजीनामा द्यावा लागला होता.
मारिन यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1985 मध्ये झाला आहे. 2015 मध्ये त्या पहिल्यांदा संसदेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर 2019 मध्ये त्या सरकारमध्ये सहभागी झाल्या व मंत्री बनल्या होत्या.