https://images.loksatta.com/2019/12/Cr.jpg?w=830
'द वॉल'

बापरे… १२ कोटींचा टीव्ही! जाणून घ्या सॅमसंगच्या या नव्या टीव्हीची वैशिष्ट्ये

जाणून घ्या कसा असणार आहे हा भव्यदिव्य आकाराचा मायक्रो इलईडी स्मार्ट टीव्ही

by

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स जगातील सर्वोत्तम टीव्ही बनवणारी कंपनी आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. सॅमसंगच्या टीव्हीचे पॅनल हे जगातील सर्वोत्तम पॅनल्स आहेत. टीव्ही निर्मिती श्रेत्रामध्ये दर्जाच्या बाबतीत सॅमसंगच्या आसपास अगदीच एखाद्या दोन कंपन्या आहेत. मात्र त्याच वेळी या टीव्हींची किंमत ऐकूनच अनेकांना धक्का बसतो. असाच एक टीव्ही सॅमसंगने बाजारात आणला आहे. या टीव्हीची किंमत ऐकल्यावर तुम्ही तोंडात बोटे घालाल. असं आम्ही का म्हणतोय तर या टीव्हीची भारतातील किंमत १२ कोटी रुपये असणार आहे. बसला ना धक्का पण ही बातमी खरी आहे.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या भव्यदिव्य आकाराच्या मायक्रो इलईडी स्मार्ट टीव्हीची औपचारिक घोषणा केली आहे. या टीव्हीचे नाव ‘द वॉल’ असं आहे. हा टीव्ही आकाराने खरोखरच एखाद्या भिंतीच्या आकाराऐवढा असल्याने त्याला ‘द वॉल’ हे नाव देण्यात आलं आहे. ८ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान लासवेगस येथे पार पडलेल्या ‘द इंटरनॅशनल कस्टमर इलेट्रॉनिक शो २०१९’मध्ये (‘सीईएस २०१९’) कंपनीने ‘द वॉल’ची पहिली झलक दाखवली होती. मायक्रो एलईडी डिस्प्ले असणारऱ्या या टीव्हीचे तीन वेगवेगळे प्रकार कंपनी बाजारात उतरवणार आहे. यापैकी पहिला १४६ इंचाचा टीव्ही मागील वर्षांपासून जगभरातील अनेक देशांमध्ये उपलब्ध आहे. १४६ इंचाच्या टीव्हीचे रेझोल्यूशन ‘४ के’ इतके आहे. यंदाच्या ‘सीईएस २०१९’मध्ये कंपनीने २१९ इंचाचा टीव्ही प्रदर्शनास ठेवला होता. या टीव्हीचे रेझोल्यूशन ‘६ के’ इतके आहे. तर सर्वात मोठा टीव्ही हा २९२ इंचाचा असणार आहे. या सर्वात मोठ्या टीव्हीचे रेझोल्यूशन चक्क ‘८ के’ इतकं असणार आहे. या टिव्हीमध्ये भन्नाट फिचर्स आहेत.

‘द वॉल’ हा टीव्ही गुगल होम तसेच अमेझॉन ‘इको’सारख्या स्मार्ट स्पिकर्सच्या मदतीने वापरता येईल. म्हणजेच रिमोट हातात न घेता टीव्ही चालू बंद करणे, चॅनेल बदलणे, आवाज वाढवणे कमी करणे अशी सगळीच कामं केवळ आवाजाच्या मदतीने करता येणार आहे. विशेष म्हणजे आयट्यून्सवरील अ‍ॅपशी हा टिव्ही कनेक्ट करता येणार आहे. या टीव्हीमध्ये वापरण्यात येणारे मायक्रो इलईडी तंत्रज्ञान हे आर्टिफिशीयल इंटेलिजन्ससाठी वापरले जाते. हा टीव्ही क्वॉटम प्रोसेसर फेक्स तंत्रज्ञानावर काम करतो.

किंमत

या टीव्हीची किंमत साडेतीन कोटी ते १२ कोटींदरम्यान आहे. बरं ही केवळ मूळ किंमत असून त्यावर अतिरिक्त करही द्यावा लागणार आहे.