https://images.loksatta.com/2019/12/morning-buletin.jpg?w=830

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा पाच महत्वाच्या बातम्या

by

नागरिकत्व सुधारणा विधेयक : आम्ही पर्याय सुचवतो, मोदी-शाह यांनी साहस दाखवावे – शिवसेना

नागरिकत्व सुधारणा विधेयक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत मांडणार आहेत. ज्यावेळी हे विधेयक मांडले जाईल तेव्हा त्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

https://images.loksatta.com/2019/12/sanjay-raut-amit-shah.jpg

नागरिकत्व सुधारणा विधेयक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत मांडणार आहेत. ज्यावेळी हे विधेयक मांडले जाईल तेव्हा त्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी अनेक राजकीय पक्षांनी आणि राज्यांनी याला विरोध केला आहे. दरम्यान, या विधेयकावर शिवसेनेनेही आपली भुमिका मांडली आहे. आम्ही पर्याय सुचवतो, मोदी-शाह यांनी ते करुन दाखवण्याचे साहस दाखवावे, असे आव्हान शिवसेनेने आपल्या मुखपत्रातील अग्रलेखातून दिले आहे. वाचा सविस्तर…

“अवाढव्य पुतळे उभारण्यापेक्षा मॉडर्न शाळा आणि विद्यालयं उभी करा”, रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर परखड टीका

https://images.loksatta.com/2019/12/Raghuram-Rajan.jpg

हिंदू राष्ट्रवाद फक्त सामाजिक तणाव वाढवणार नाही, तर भारताला आर्थिक विकासाच्या मार्गावरुन भरकटवण्याचं काम करेल असं मत रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. इंडिया टुडे मॅगजिनमध्ये लिहिलेल्या ‘How to fix the economy’ या लेखात रघुराम राजन यांनी आपलं परखड मत मांडलं आहे. वाचा सविस्तर…

कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक : येडियुरप्पा सरकारचं भवितव्य आज ठरणार

https://images.loksatta.com/2019/12/bsy-4.jpg

कर्नाटकमधील एच.डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं भवितव्य आज ठरणार आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर होत असलेल्या विधानसभेच्या १५ जागांवरील पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरूवात झाली असून, या १५ जागांपैकी ६ जागांवर विजय मिळवणे येडियुरप्पा सरकारच्या अस्तित्वासाठी महत्वाचं असणार आहे. वाचा सविस्तर…

Video : ढिसाळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विराटने दाखवून दिलं, असा पकडतात झेल…

https://images.loksatta.com/2019/12/Virat-Super-Catch-1.jpg

पहिल्या सामन्यात बाजी मारल्यानंतर, तिरुअनंतपुरमच्या मैदानावर विंडीजच्या संघाने धडाकेबाज फलंदाजी करत मालिकेत बरोबरी साधली. लेंडन सिमन्स, एविन लुईस, शेमरॉन हेटमायर आणि निकोलस पूरन या फलंदाजांनी दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय गोलंदाजांची पिसं काढली. विजयासाठी दिलेलं १७१ धावांचं आव्हान विंडीजच्या फलंदाजांनी केवळ २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. वाचा सविस्तर…

Birthday Special : ‘मिस आशिया’चा किताब पटकावणारी ही अभिनेत्री करायची कंपनीमध्ये काम

https://images.loksatta.com/2019/12/New-Project-3.jpg

आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे दिया मिर्झा. तिचे फारसे चित्रपट नसले तरी तिचे चाहते असंख्य आहेत. आज ९ डिसेंबर रोजी दियाचा वाढदिवस आहे. १९८१ मध्ये दियाचा जन्म हैद्राबाद येथे झाला. तिने ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबच अभिनेता आर माधवन मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत दियाने लाखो चाहत्यांच्या मानत घर केले. या एकाच चित्रपटाने तिला लोकप्रियता मिळवून दिली होती. वाचा सविस्तर…