या अभिनेत्रीने सेटवरच केली होती चंकी पांडेची धुलाई, आता दिसते अशी
शॉर्ट टेम्पर्ड, अॅग्रेसिव्ह अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाई.
by ऑनलाइन लोकमतठळक मुद्दे
- अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण फराह आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही.
90च्या दशकातील एक गाजलेला चेहरा म्हणजे, अभिनेत्री फराह नाज हिचा. आज फराहचा वाढदिवस. त्या काळातील स्टार असलेली फराह शॉर्ट टेम्पर्ड, अॅग्रेसिव्ह अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाई. ती कधी कुणाला चोप देईल, याचा नेम नसे. तिच्या याच अशा वागण्यामुळे ती सतत चर्चेत राहायची.
एकदा ‘कसम वर्दी की’ या सिनेमाच्या सेटवर फराहने अभिनेता चंकी पांडेची धुलाई केली होती. स्वत: फराहने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. चंकी नेहमी ‘आय अॅम द मॅन’ म्हणत, अश्लिल इशारे करायचा. त्यामुळेच एकदिवस मी त्याला वुमन पॉवर दाखवून दिला, असे फराहने सांगितले होते.
हेच नाही तर एका पार्टीत फराहने एका निर्मात्याच्याही थोबाडीत हाणली होती. होय, निर्माता फारूक नाडियाडवाला याने फराहला बीयर पिण्याची आॅफर दिली होती. यावरून दोघांत वाद झाला होता.
फराहने अनेक हिट सिनेमे दिलेत. पण करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना अचानक ती बॉलिवूडमधून गायब झाली. आज फराह कमालीची बदलली आहे. इतके की, तिला ओळखणेही कठीण व्हावे.
करिअर शिखरावर असताना फराहने अचानक विंदू दारा सिंग याच्याशी लग्न केले. नव्वदीच्या दशकात एका चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. काहीच महिन्यात दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नानंतर वर्षभरातच या दांम्पत्याला मुलगा झाला. मात्र त्यानंतर दोघांमध्ये वाद व्हायला लागले आणि 2002 मध्ये फराह मुलाला घेऊन दुसरीकडे राहायला लागली. अखेर दोघेही घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत आलेत.
फराहचा घटस्फोट झाल्यानंतर काहीच वर्षांत तिची ओळख सुमीत सेहगल या अभिनेत्यासोबत झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. विंदू आणि फराहच्या पहिल्या मुलाला देखील सुमीतने स्वीकारले.
फराह आणि सुमीत त्यांच्या संसारात खूश असून सुमीतचे देखील हे दुसरे लग्न आहे. त्याचे पहिले लग्न सायरा बानू यांची भाची अभिनेत्री शाहीन बानूसोबत झाले होते. सुमीतने स्वर्ग जैसा घर, शानदार, साजन की बाहो में, सौदा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.