धक्कादायक! पोलीस खबरी असल्याचा संशयावरून नक्षल्यांकडून युवकाची हत्या
या सर्वांविरोधात कोरची पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
by ऑनलाइन लोकमतठळक मुद्दे
- भिमनखोजी येथील मनोज दयाराम हिडको या १७ वर्षीय युवकाची बुधवारच्या मध्यरात्री घरातून बाहेर काढून हत्या केली.
- याबाबतची तक्रार मृतक मनोजचा भाऊ रोहित हिडको यांनी कोरची पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.
कोरची (गडचिरोली) - पोलीस खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी कोरची तालुक्यातील भिमनखोजी येथील मनोज दयाराम हिडको या १७ वर्षीय युवकाची बुधवारच्या मध्यरात्री घरातून बाहेर काढून हत्या केली.
नक्षलवाद्यांनी रात्री मनोजचे घर गाठून त्याला झोपेतून उठविले. तू पोलिसांना आमची माहिती देतोस काय, असे विचारून त्याच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडली. मनोज हा जागीच गतप्राण झाला. याबाबतची तक्रार मृतक मनोजचा भाऊ रोहित हिडको यांनी कोरची पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. सावजी तुलावी, यशवंत बोगा, राजा मडावी, विनोद बोगा, जनी गावडे, निर्मला ताडामी, शेवंती नैताम, सगुणा नरोटी, शशीकला धुर्वे, दलपत कोवाची, रेघम नैताम, प्रमोद कचलामी, योगेश मडकाम यांच्यासह जवळपास २५ नक्षलवाद्यांनी मिळून मनोजची हत्या केली, असा उल्लेख तक्रारीत केला आहे. या सर्वांविरोधात कोरची पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.