https://images.loksatta.com/2019/11/mahindra.jpg?w=830

सायकल रिक्षावरचा महिंद्रा कंपनीचा उलटा लोगो पाहून आनंद महिंद्रा म्हणतात…

त्यांनी सर्वच नेटकऱ्यांचं मन जिंकलं.

by

दिग्गज व्यावसायिक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतात. व्हिडीओ असतील किंवा फोटो ते कायम आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत असतात. याव्यतिरिक्त आपल्या फॅन्सना कायम रिप्लायही ते देताना दिसतात. नुकतीच निरज प्रताप सिंग या ट्विटर युझरनं महिंद्रा यांच्या ट्विटवर कमेंट करत एका सायकल रिक्षाचा फोटो पोस्ट केला. यानंतर आनंद महिंद्रांनी खुश होऊन एक मोठा निर्णय घेतला. त्यांच्या खुश होण्यामागचं कारण म्हणजे त्या सायकल रिक्षावर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा लोगो लावण्यात आला होता. त्यांनी त्या सायकल रिक्षा चालकाला नवं आणि आधुनिक वाहन देण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी सर्वच नेटकऱ्यांचं मन जिंकलं.

तुम्हाला हे कदाचित विनोदी वाटत असेल आणि ते आहे देखील. विशेषत: तेव्हा जेव्हा कंपनीचा लोगो उलटा लावला असेल. परंतु मी खुश आहे. आमच्या ब्रँडला एक सायकल रिक्षावालाही महत्त्वाकांक्षा म्हणून पाहतो. आम्ही त्याला एक अपग्रेडेड वाहन देऊ. ज्याच्या सहाय्याने ती व्यक्ती आपल्या पुढील आयुष्यात प्रगती करू शकेल, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.