संजय लीला भन्साळी चित्रपट बनवत असणाऱ्या गंगुबाई आहेत तरी कोण?
‘द मॅडम ऑफ कामाठीपुरा’ अशी त्यांची ओळख
by लोकसत्ता ऑनलाइनप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. भन्साळी लवकरच कामाठीपुऱ्यामधील विशेष चर्चिल्या गेलेल्या गंगुबाई काठीयावाडी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत झळकणार असून तिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ‘गंगुबाई काठीयावाडी’ असंच या चित्रपटाचं नाव असणार आहे. पण गंगुबाई नक्की आहेत तरी कोण याबद्दल अनेकांना माहिती नाही. त्यावरच टाकलेली ही नजर…
- भन्साळी ज्याच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवत आहेत त्या गंगुबाई ‘द मॅडम ऑफ कामाठीपुरा’ या नावाने ओळखल्या जायच्या.
- त्यांचे आधीचे नाव हरजीवन दास काठीयावाडी असं होतं. त्या गुजरातमधील काठीयावाडी येथील होत्या.
- वयाच्या १६ व्या वर्षी गंगुबाईंना त्यांच्या प्रियकरानेच ५०० रुपयांना कामाठीपुरामध्ये विकले.
- अगदी कोवळ्या वयात त्यांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं.
- वेश्याव्यवसायात आल्यानंतर त्यांचं संपूर्ण जीवन बदलून गेलं.
- वेश्याव्यवसाय करत असताना त्यांची अनेक कुख्यात गुंडांसोबत ओळख झाली आणि तेथूनच त्यांच्या गुन्हेगारी विश्वातील प्रवास सुरु झाला.
- गुंगुबाई या कामाठीपुरामधील महिला डॉन झाल्या. त्या वेश्याव्यावसायही चालवू लागल्या. हिरा मंडी येथे त्या वेश्याव्यावसाय चालवायच्या.
- सध्या त्या ८० वर्षाच्या असून मुंबईमध्येच राहतात.
- या चित्रपटाची कथा हुसैन जैदी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे.
- या चित्रपटामध्ये अजय देवगण हा अलियाबरोबर काम करणार असल्याचे समजते.
- आलियाने याआधी उडता पंजाब, राझी, हायवे या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे गंगुबाईंची भूमिका ती कशी साकारते याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
- हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे भन्साळी प्रोडक्शनने स्पष्ट केलं आहे.