https://images.loksatta.com/2019/11/Naseeruddin-Shah.jpg?w=830

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा तन्वीर पुरस्कारानं सन्मान

९ डिसेंबर रोजी कोथरूडमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

by

रुपवेध प्रतिष्ठानचा २०१९ चा तन्वीर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना जाहीर करण्यात आला आहे. रुपवेध प्रतिष्ठानच्या कार्यवाह दिपा लागू यांनी याबाबत माहिती दिली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषेदत त्या बोलत होत्या.

गेल्या पंधरा वर्षापासून रुपवेध प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिने सृष्टीतील कलावंताना तन्वीर सन्मान आणि नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल तन्वीर नाट्यधर्मी पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यंदाचा २०१९ चा तन्वीर सन्मान जेष्ठ अभिनेते ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, तर तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती दिपा लागू यांनी दिली.

सन्मानचिन्ह, मानपत्र आणि १ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ९ डिसेंबर रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी, रत्ना पाठक आदी दिग्गज कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती दिपा लागू यांनी दिली.