https://images.loksatta.com/2019/11/Train.jpg?w=830

Video: लोणावळा लोकल आणि डेक्कन क्वीन एकाच ट्रॅकवर आली अन्…

सकाळी सात ते आठच्या दरम्यान घडली घटना

by

आज (शुक्रवारी) सकाळी पुणे-लोणावळा लोकल ट्रेन आणि डेक्कन क्वीन एकाच लोहमार्गावर एका पाठोपाठ एक रेल्वे थांबल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर वेगवेगळ्या तर्क वीतर्क लढवण्यात येत आहेत. मात्र, रेल्वेचा अपघात टळला, समोरा समोर रेल्वे आल्याच्या बातम्या वाऱ्याच्या वेगाने पसरविण्यात आल्या. परंतू या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी लोणावळा लोहमार्गावर रुळाला तडे गेले होते. त्यामुळे लोणावळा लोकल ही काही अंतरावर थांबविण्यात आली. दरम्यान, त्या पाठोपाठ येणारी डेक्कन क्वीन देखील लोकलच्या काही अंतरावर सुरक्षित थांबविण्यात आली. मात्र, दोन्ही रेल्वे एकमेकांच्या समोर आल्याचं आणि अपघात टळल्याची अफवा पसरविण्यात आली. पसरवण्यात येणाऱ्या या अफवांमध्ये काही तथ्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सदर घटना आज सकाळी सात ते आठच्या दरम्यान घडली आहे. रेल्वे रुळाची दुरुस्ती केल्यानंतर दोन्ही रेल्वे गाड्या एकमेकांच्या पाठोपाठ काही अंतराने धावल्या. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मालवाहू रेल्वे गेल्याने रुळाला तडे जाऊ शकतात अस सांगण्यात आले आहे.

चिंचवड आणि लोणावळा या दरम्यान जास्त रेल्वे गाड्या धावतील यासाठी प्रत्येक एक किलोमीटरवर सिग्नल बसविण्यात आले आहे. या सिग्नल ला ऍटोमॅटिक ब्लाँग सिग्नल सिस्टम असं म्हणतात. यामुळे एकाच मार्गावर काही अंतराने एकापेक्षा जास्त रेल्वे गाड्या धावू शकतात. अगोदर दहा किलोमीटर अंतर रेल्वेच्या दरम्यान असायचं. आजची घटना ही अपघात नाही सुरक्षित अंतरावर डेक्कन रेल्वे थांबवली होती. समोरील सिग्नलवर रेल्वे थांबलेली आहे. तसेच एका पाठोपाठ रेल्वे धावत असेल तर आश्चर्य बाळगू नये अस रेल्वे पीआरओ यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना म्हटले आहे.