हिवाळ्यात फिरायला जायचयं? मग या ठिकाणांना नक्की भेट द्या
रोजचं ताणतणावाचं आयुष्य जगत असताना कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल. तर कोणताही वेळ न घालवता आजच तयारीला लागा.
by ऑनलाइन लोकमत(Image credit- Tripoto)
रोजचं ताणतणावाचं आयुष्य जगत असताना कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल. तर कोणताही वेळ न घालवता आजच तयारीला लागा. भारतातील काही हिवाळ्यात आवर्जून भेट द्यायला हवीत. अशा काही ठिकाणांची माहीती आज तुम्हाला देणार आहोत.
नैनीताल-
(Image credit-holidify)
भारतातील अतिशय सुंदर स्थळांपैकी नैनीताल हे एक ठिकाण आहे. नैनीताल हिमालयाच्या कुशीत वसलेले नैनीताल समुद्र सपाटीपासून साधारण 2000 मीटर उंचावर आहे. हे ठिकाण उंचावर असल्याने येथील तापमान वर्षभर कमी असते. जर तुम्हाला बर्फाचा आनंद घ्यायचा असेल आणि सोबत थंडीची मजा लूटायची असेल. तर नैनीताल एक उत्तम ठिकाण आहे.
अंदमान -
(Image credit-Holidify)
अंदमान ठिकाण जेथे आनंद, शांती मिळते तेथे पर्यटक फिरायला जाण्यास उत्सुक असतात. तुम्हालाही जर असा अनुभव घ्यायचा असेल तर अंदमानची सफर नक्कीच झाली पाहिजे. अंदमान एक छोटेसे द्वीप आहे. हे पर्यटकांचे मनापासून आवडणारे ठिकाण असल्याने येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक हजेरी लावत असतात.
गोवा-
(Image credit- Lonelyplanet)
हिवाळ्यात गोव्यातील वातावरण पाहण्यासारखे असते. गोव्याची समुद्र आणि चौपाटीचा देखावा फार सुंदर असतो. गोव्यात ख्रिसमस आणि न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी येथे देशभरातुन अनेक पर्यटक येतात.
दीव-दमण-
( Image credit-Tour india)
हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी गुजरातमधील बेस्ट ठिकाण दमण आणि दीव मानलं जातं. सुंदर बीच आणि थंडीचं मनमोहक वातावरण या ठिकाणी असतं. मुंबईपासुन फार लांब नसलेले हे ठिकाण अत्यंत सुंदर आहे.
राजस्थान-
(Image credit- Wikipedia)
राजस्थानला फिरायला जाण्यात एक वेगळीच मजा आहे. उत्तर भारतातील इतर ठिकाणांपैकी राजस्थानमध्येदेखील थंडीची मजा लूटता येते. पण येथे पश्चिमी प्रदेशांपेक्षा थंडीचा कडाका हलका असतो. या ठिकाणाचे वैशिष्टे म्हणजे येथे प्राचीन किल्ले, जे येथे ‘गढ’ नावाने प्रसिद्ध आहेत. या काळामध्ये जोधपुर आणि जैसलमेर फिरण्यात एक वेगळाच आनंद आहे. जैसलमेर येथील दूरपर्यंत पसरलेले वाळवंट सगळ्यांचे मन मंत्रमुग्ध करतो. तसेच राजस्थानची पिंक सीटी जयपूर हे राजस्थानच्या पर्यटनाचे आकर्षण समजले जाते.