https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/dog-tiger65_201911331852.jpg
...म्हणून 'या' शेतकऱ्यानं आपल्या कुत्र्याला 'वाघोबा' बनवलं!

...म्हणून 'या' शेतकऱ्यानं आपल्या कुत्र्याला 'वाघोबा' बनवलं!

शेती करताना शेतकऱ्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

by

शिवमोगाः शेती करताना शेतकऱ्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अस्मानी आणि सुलतानी संकटांबरोबरच जंगली श्वापदांचा त्याला त्रास असतो. शेतात रात्रीत डुक्कर किंवा माकडं, इतर जनावरं घुसून पिकांची नासधूस करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. जंगली श्वापदांच्या समस्येवर कर्नाटकातील एका शेतकऱ्यानं जबरदस्त आयडिया शोधून काढली आहे. माकडांपासून शेताला वाचवण्यासाठी या अवलियानं एका कुत्र्यालाच वाघोबा बनवलं आहे. त्यानं या कुत्र्याला वाघाच्या रंगांनी रंगवून टाकलं. कर्नाटकातल्या शिवमोगा येथे हा प्रकार घडला असून, आता हा कुत्रा एखाद्या वाघासारखाच दिसतो. कुत्र्याच्या अंगावर पिवळे आणि काळ्या रंगांचे पट्टे काढण्यात आल्यानं तो एकदम वाघासारखाच दिसतो.
 
डेक्कन हेरॉल्डच्या रिपोर्टनुसार, शिवमोगातल्या मलंड क्षेत्रातील एका शेतकऱ्यानं हा नवाच प्रयोग केला आहे. या भागात माकडांनी उच्छाद आणलेला असून, शेतकऱ्यांच्या पिकांची ती माकडं नासधूस करत आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यानं चक्क कुत्र्यालाच वाघ बनवलं आहे. शेतकरी श्रीकांत गौडा म्हणतो, उत्तर कर्नाटक गेल्यानंतर ही कल्पना माझ्या डोक्यात आली. चार वर्षांपूर्वी मी भटकलला गेलो होतो. तेव्हा शेतापासून माकडांना दूर ठेवण्यासाठी खोट्या वाघोबाच्या प्रतिमेचा वापर करण्यात येत होता. गौडा यांनी आपल्या भागातही हीच रणनीती वापरण्याचा विचार केला. परंतु यातून फारसा फायदा होत नसल्याचीही खदखद त्यांनी व्यक्ती केली आहे. हेअर डायच्या मदतीनं ते या कुत्र्याला रंगवतात, तो रंग महिन्याभरात निघत असल्यानं त्या कुत्र्याला महिन्यातून एकदा रंगवावं लागतं.