https://images.loksatta.com/2019/11/bhumi-pednekar-.jpg?w=830
भूमी पेडणेकर

मराठमोळ्या भूमीला चाहत्याने केली लग्नाची मागणी; तिच्या उत्तराने जिंकलं नेटकऱ्यांचं मन

ट्विटरवर भूमी पेडणेकर चर्चेत

by

‘दम लगा के हैशा’, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘शुभमंगल सावधान’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या ट्विटरवर चांगलीच चर्चेत आली. यामागचं कारण म्हणजे तिने एका लग्नाच्या मागणीला दिलेलं उत्तर.

एका चाहत्याने भूमीला ट्विटरच्या माध्यमातून लग्नाची मागणी घातली. ‘तुझा फोटो पाहिल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही. तू खूप सुंदर आहेस. तू एखादी सामान्य व्यक्ती असायला हवी होतीस. पण तू आता खूप मोठी सेलिब्रिटी आहेत. त्यामुळे मी कितीही प्रेम केलं तरी तू एखाद्या सेलिब्रिटी नसलेल्या व्यक्तीशी लग्न करणं कठीण आहे. याचं मला खूप दु:ख आहे’, असं त्या चाहत्याने भूमीला टॅग करत लिहिलं. त्यावर भूमीने उत्तर दिलं, ‘सेलिब्रिटी असो किंवा सामान्य व्यक्ती..सध्या तरी लग्नाचा विचार नाही. पण मोठ्या पडद्यावर मी शक्य तितक्या वेळा येण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे तुम्ही मला तिथे नेहमीच भेटू शकता.’

भूमीने दिलेलं उत्तर पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं. एका सामान्य व्यक्तीला सेलिब्रिटीने कसं उत्तर द्यावं, याचं उत्तम उदाहरण तू आहेस, अशा शब्दांत एका युजरने तिची प्रशंसा केली. तर दुसऱ्या युजरने तिला विनम्र म्हटलं.

Video : रणवीरने दीपिकाला भर मुलाखतीत केलं किस; अँकर म्हणाली..

भूमीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटात कार्तिक आर्यन व अनन्या पांडे यांच्यासोबत झळकणार आहे. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. मुदस्सर अजिजने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ६ डिसेंबर रोजी तो प्रदर्शित होणार आहे.