सीबीएसई बोर्ड परीक्षा- २०२० साठी करण्यात आले मोठे बदल
बोर्ड प्रत्येक विषयात अंतर्गत मुल्यांकन आणत आहे
by लोकसत्ता ऑनलाइनकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे जे विद्यार्थी जे २०२० मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परिक्षेस पात्र आहेत, ते आता या परीक्षा पद्धतीमधील मोठ्या बदलाचे साक्षीदार होणार आहेत. बोर्ड प्रत्येक विषयात अंतर्गत मुल्यांकन आणत आहे, जे बोर्डाच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्यास सुलभता आणेल.
नव्या नियमांनुसार, सीबीएसई शाळांमध्ये गणित, भाषा, राज्यशास्त्र या विषयांसह विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनावर भर दिला आहे. हे बोर्डाच्या परीक्षेतील अधिक वस्तूनिष्ठ प्रकराच्या प्रश्नांसाठी मार्ग मोकळा करेल.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या cbseacademic.nic.in या अधिकृत वेबसाइटवर २०२० बोर्डाच्या परीक्षेसाठी नमुना पेपर आणि गुणांकन पद्धत देखील जारी केली आहे.
सीबीएसईच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना धडे आठवत बसण्यापासून थांबवण्यासाठी, विश्लेषणात्मक कौशल्ये विकसीत करण्यासाठी, तर्क क्षमता विकसीत करणे आणि संस्थांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी ही पावलं उचलल्या गेली आहेत.