https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/first-impression_201911331791.jpg
एकाच भेटीत लोकांना इम्प्रेस करण्याची खास  कला, ती शिकली नाही तर पचकाच!

एकाच भेटीत लोकांना इम्प्रेस करण्याची खास  कला, ती शिकली नाही तर पचकाच!

फस्ट इम्प्रेशनच लास्ट ठरलं आणि आपल्यावर फुली बसली असं होवू नये.

by

ठळक मुद्दे

सखी ऑनलाईन  टीम 

पहिल्याच भेटीत मला कळलं होतं की तो माणूस काही खास नाही किंवा पहिल्याच भेटीत वाटलं की मस्त आहे ती, आमची छान दोस्ती होईल. हे आपण कशाच्या जोरावर म्हणतो. अगदी कॉलेजच्या काळात, ते मुलाखतीतही फस्र्ट इम्प्रेशन चांगलं व्हायला पाहिजे म्हणून धडपडतो. दाखवून-पाहून केलेल्या लग्नात  तर पहली नजर में पसंतीचे केवढे किस्से असतात. तुझं इम्प्रेशन सुधर असे फुकट सल्लेही आपल्याला लोक देतात. आणि फस्ट इम्प्रेशन हेच लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात. पण अनेकजण मारे इम्प्रेशनच्या प्रेमात असतात पण त्यांनी तोंड उघडलं की पचका होतो. काहीही बोलतात. नको ते बोलतात. उगीच हसतात. फालतू जोक मारतात. न बोलणं उत्तम असं अनेकदा वाटतं. पण काहीच बोललं नाही तर शिष्टपणाचा ठप्पाही बसतो. त्यामुळे नेमकं कसं वागणार, आपल्या फस्ट इम्प्रेशनचं काय करणार?
त्यासाठीच या काही अगदी सोप्या गोष्टी.
जो इम्प्रेशन जमाये और बात बन जाये! 

https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/first-impression-1_201911331810.jpg

1) कपडे. हा महत्वाचा मुद्दा. आपले कपडे भारी, फॅशनेबल, महागडे, ब्रॅण्डेड असे नव्हेत. तर ते कपडे आपल्या मापाचे, उत्तम फिटिंगचे आणि प्रसंगाला अनुरुप असावेत. 

2) चेहर्‍यावर हसू आणि आत्मविश्वास हवा. हसू म्हणजे फिदीफिदी हसू नव्हे. प्रसन्न चेहरा.आणि आत्मविश्वास.

3)जी कोणी अभिनेत्री आवडत असेल तिची स्टाइल कॉपी केली, तसे रंग निवडले तरी चालतात. फक्त ते आपल्याला शोभले पाहिजेत.

4) मोजकं बोला. कुणी विचारलं नसताना ढमकन काही बोलू नका.

5) फोनवर मोठमोठय़ानं बोलू नका. फोनमध्येच नाक खुपसून राहू नका. 

6) कुणी काही बोलत असेल तर मध्येच काहीतरी फालतू प्रश्न विचारू नका.

7) लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यावं पण हसू होणार नाही, फार उठवळ दिसणार नाही याचीही काळजी घ्या.