सेल्फीत तुम्ही कायम जाडच दिसता?- मग या ट्रिक वापरा आणि बारीक दिसा!
सेल्फी हल्ली सगळ्याचजणी काढतात, पण तो उत्तम कसा काढायच्या या काही सोप्या गोष्टी
by लोकमत न्यूज नेटवर्कठळक मुद्दे
- सेल्फी काढणं वाटतं तेवढं सोपं नाहीच!
- सखी ऑनलाइन टीम
सेल्फी काढण्याचा मोह कुणाला होत नाही? काढलेल्या सेल्फीत आपण बारीक दिसावं असंही कुणाला वाटत नाही?
पण अति सेल्फी काढण्याची सवय व्यसनात बदलू शकते. त्यामुळे वेळीच काळजी घेतली पाहिजे. आणि सेल्फीत बारीक दिसण्यासाठी पोट आत घेऊन, श्वास रोखून उभं राहण्याची गरज नसते. त्याशिवायही काही सोप्या युक्त्या वापरून तुम्ही बारीक दिसू शकता.
कसं? वाचा!
सेल्फीत बारीक दिसण्यासाठी ..
फोटोत बारीक दिसण्यासाठी अनेक जण डाएटचा मार्ग निवडतात. डायट फिटनेससाठी जरूर करा पण फोटोत बारीक दिसण्यासाठी काही सोप्या युक्त्या वापरू शकता.
1. आडवे पट्टे असलेल्या ड्रेस कधीही घालू नका. जाडच दिसाल. मल्टी कलरमध्येही वजन आहे त्या पेक्षा जरा उजवीकडेच दिसतं. त्यामुळे मल्टीकलर टाळा. योग्य फिटिंगचे कपडे घाला. काळ्या रंगात सगळे बारीक दिसतात. थिंक अबाउट इट.
2.फोटोसाठी स्माईल देताना हनुवटी थोडी वर उचला आणि जीभ टाळूला टेकवा. यामुळे तुमचा चेहरा बारीक दिसतो आणि तुम्हाला डबल चीन असली तरी लपते.
3. फोटोसाठी सरळ, ताठ कधीही उभं राहू नका. जरा तिरके वळून उभे रहा. शरीर कॅमेर्याच्या दिशेनं वळलेलं हवं. एक पाय दुसर्याच्या थोडा पुढे ठेवा. जो पाय पुढे आहे त्याचा टो कॅमेर्यांच्या दिशेने करा आणि वजन दुसर्या पायावर टाका. नीट उभे राहिलात तर आपोआप बारीक दिसाल.
4. फोटो काढताना कधीही खालून अँगल नको. त्याने माणसं जाडच दिसतात. आपल्या खांद्याच्या वर कॅमेरा धरून फोटो काढावा. किंवा सेल्फी स्टिकने. म्हणजे आपण स्लिम दिसतो.
5. कॅमेर्याच्या सगळ्यात जवळ असलेली व्यक्ती नेहमीच आहे त्यापेक्षा जाड दिसते. त्यामुळे कॅमर््यापासूनचे अंतर महत्वाचे आहे. आणि हो, छान मोकळं हसा. अवघडल्यासारखे हसलात तर फोटो वाईटच येईल.